Pimpri Chinchwad Fancy Number Plate Crackdown: फॅन्सी नंबर प्लेटविरोधात वाहतूक पोलिसांची आक्रमक कारवाई

नियमबाह्य नंबर प्लेट असलेल्या वाहनांची जागेवरच जप्ती; नागरिकांना आरटीओच्या नियमांनुसार नंबर प्लेट वापरण्याचे आवाहन
Pimpri Chinchwad Fancy Number Plate Crackdown
Fancy Number Plate CrackdownPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांवर लावल्या जाणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेटविरोधात वाहतूक पोलिसांनी आक्रमक मोहीम सुरू केली आहे. केवळ दंड आकारण्यापुरती कारवाई न करता नियमबाह्य नंबर प्लेट असलेल्या वाहनांची प्लेट थेट जागेवर काढून जप्त केली जात आहे. त्यासाठी शहरातील चौकाचौकात पोलिस कर्मचारी पाना आणि स्क्रू ड्रायव्हर घेऊन तैनात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहनचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Pimpri Chinchwad Fancy Number Plate Crackdown
Pimpri Chinchwad Red Zone Map: महापालिका प्रकाशित करण्यात उशीर, जिल्हाधिकारी करणार अधिकृत

अनेक वाहनचालक आपल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) निश्चित केलेल्या नमुन्याऐवजी वेगवेगळ्या डिझाईनच्या, आकर्षक फॉन्टमधील किंवा आकड्यांचे स्वरूप बदललेल्या नंबर प्लेट बसवतात. काहीजण वाहन क्रमांक उठून दिसावा म्हणून विविध चिन्हे, स्टिकर्स किंवा ग््रााफिक्सचा वापर करतात. तर काही वाहनांवर क्रमांक अगदी छोट्या आकारात लिहून तो वाचणे कठीण होईल अशी मांडणी केली जाते. त्यामुळे वाहनाचा क्रमांक सहजपणे ओळखता येत नाही.

Pimpri Chinchwad Fancy Number Plate Crackdown
Pimpri Chinchwad Tree Conservation: रस्त्यांच्या कामामुळे झाडांचे संवर्धन धोक्यात

याचा परिणाम वाहतूक नियमभंगाच्या कारवाईसह अपघात किंवा गुन्ह्यांच्या तपासावर होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेज किंवा प्रत्यक्ष पाहणीत वाहन क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याने तपासात अडथळे निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने शहरभर विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मोहिमेअंतर्गत पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, सांगवी, वाकड, दापोडी, हिंजवडी, चाकण, मोशी आदी भागांतील प्रमुख चौक, सिग्नल आणि वर्दळीच्या मार्गांवर वाहतूक पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. संशयास्पद नंबर प्लेट असलेले वाहन दिसताच ते थांबवून तपासणी केली जाते. नियमबाह्य प्लेट असल्याचे आढळल्यास ती लगेचच काढून जप्त केली जाते आणि संबंधित वाहनचालकावर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाते.

या मोहिमेमुळे अनेक वाहनचालकांना जागेवरच दंड भरावा लागत असून काहींनी आपल्या वाहनांवरील नंबर प्लेट बदलण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आरटीओच्या नियमांनुसार ठरावीक फॉन्ट व आकाराच्या नंबर प्लेटच वापरण्याचे आवाहन केले आहे.

Pimpri Chinchwad Fancy Number Plate Crackdown
Pimpri Chinchwad Birthday Celebration Ban: ‘भाई का बर्थडे‌’ साजरा करताना फटाके, गोंधळ वर बंदी

नागरिकांमध्ये उत्सुकता

फॅन्सी नंबर प्लेटवर प्रभावी कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वेगळीच पद्धत अवलंबली आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये पोलिस कर्मचारी पाना आणि स्क्रू ड्रायव्हर घेऊन वाहनांची तपासणी करताना दिसत आहेत. संशयास्पद प्लेट असलेले वाहन थांबवून स्क्रू काढत ती प्लेट लगेच उतरवली जाते. काही ठिकाणी ही कारवाई पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

दादा, मामा, भाऊ नावांच्या फॅन्सी प्लेट

कारवाईदरम्यान काही वाहनांवर क्रमांकासोबत किंवा त्याऐवजी ‌‘दादा‌’, ‌‘मामा‌’, ‌‘भाऊ‌’, ‌‘किंग‌’, ‌‘बॉस‌’ अशा शब्दांच्या प्लेट लावल्याचे आढळून आले. काही वाहनांवर वाहन क्रमांक लहान अक्षरांत ठेवून मोठ्या अक्षरांत नावे झळकवलेली दिसली. अशा प्रकारच्या प्लेट नियमबाह्य असल्याने त्याही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कार्यकर्त्यांशी पोलिसांची खडाजंगी

फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई करताना काही ठिकाणी पोलिस आणि तथाकथित दादा-भाऊंच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. वाहनावरील प्लेट काढण्याची कारवाई सुरू होताच काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांना फोन करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. मात्र वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट निर्देश देण्यात आल्याने पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई सुरूच ठेवली आहे.

Pimpri Chinchwad Fancy Number Plate Crackdown
PMRDA Projects Stalled: पीएमआरडीएचे सात मोठे प्रकल्प अजूनही रखडले

शहरात काही वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने फॅन्सी नंबर प्लेट लावल्याचे आढळून येत आहे. अशा प्लेटमुळे वाहन क्रमांक स्पष्ट दिसत नाही आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी तसेच गुन्ह्यांच्या तपासात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विशेष मोहीम राबवून अशा वाहनांवरील फॅन्सी नंबर प्लेट जागेवरच काढून जप्त करण्यात येत आहेत. नागरिकांनी आरटीओने निश्चित केलेल्या नमुन्यानुसारच नंबर प्लेट वापरणे अपेक्षित आहे.

विवेक पाटील, उपायुक्त, वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news