Pimpri Chinchwad Domestic Gas Supply Check: घरगुती गॅस पुरवठा तपासणीसाठी विभागाची विशेष मोहीम

पुरवठा नियमांचे पालन होत आहे की नाही याची पाहणी; गॅस वितरणात अनियमितता आढळल्यास कडक कारवाईचा इशारा
Domestic Gas
Domestic GasPudhari
Published on
Updated on

पिंपरी: इराण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने शहरातील गॅस वितरकांकडील साठ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Domestic Gas
Pimpri Chinchwad Fancy Number Plate Crackdown: फॅन्सी नंबर प्लेटविरोधात वाहतूक पोलिसांची आक्रमक कारवाई

या तपासणीद्वारे गॅसचे योग्य वितरण होत आहे की नाही, याची खात्री करण्यात येणार आहे. अलीकडच्या काळात गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अनियमितता दिसून येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी ग््रााहकांना वेळेवर गॅस मिळत नसल्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

Domestic Gas
Pimpri Chinchwad Red Zone Map: महापालिका प्रकाशित करण्यात उशीर, जिल्हाधिकारी करणार अधिकृत

काही ठिकाणी गॅससाठा असतानाही ग््रााहकांना उशिरा सिलिंडर देण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तपासणीदरम्यान गॅस वितरकांकडील नोंदी, साठा आणि वितरणाची प्रक्रिया यांची पाहणी केली जाणार आहे. जर कुठेही नियमांचे उल्लंघन किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news