Pimpri Chinchwad MLA Logo Case: आमदार नसतानाही कारवर ‘आमदार’चा लोगो; पिंपरी-चिंचवडमध्ये दोघांवर गुन्हे!

व्हीआयपी सवलत आणि आर्थिक फायद्यासाठी लोगो वापरल्याचा आरोप; बीएमडब्ल्यू आणि क्रेटावर अशोक स्तंभासह विधानसभा सदस्याचा उल्लेख
Fake MLA Logo
Fake MLA LogoPudhari
Published on
Updated on

पिंपरी: कोणतीही अधिकृत परवानगी नसताना बीएमडब्ल्यू कारच्या पुढील काचेवर 'आमदार, विधानसभा महाराष्ट्र राज्य मुंबई' असा लोगो लावल्याप्रकरणी दोघांविरोधात भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आर्थिक फायदा आणि व्हीआयपी सवलत मिळविण्याच्या उद्देशाने हा लोगो वापरल्याचा आरोप आहे.

Fake MLA Logo
Pimpri Chinchwad Ganeshotsav Police Security: पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘मेगा’ बंदोबस्त; २,७२७ अधिकारी-कर्मचारी मैदानात!

वसिम अहमद अब्दुल जलील आळंद (४२, रा. हडपसर) आणि हितेंद्र अशोक कवडे (रा. घोरपडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रविवार (दि. १३) भोसरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Fake MLA Logo
Pimpri Chinchwad Dhol Tasha: गणेशोत्सवाची चाहूल; पिंपरी-चिंचवडमध्ये ढोल-ताशांच्या मागणीला जोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परिसरात वाहतूक पोलिसांना बीएमडब्ल्यू कारच्या पुढील काचेवर 'मा. आमदार विधानसभा महाराष्ट्र राज्य मुंबई' असा लोगो लावल्याचे आढळून आले. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना आर्थिक फायदा आणि व्हीआयपी सवलत मिळविण्याच्या उद्देशाने लोगोचा वापर केल्याचा आरोप आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Fake MLA Logo
Dehugaon Water Shortage: गणेशोत्सवात देहूगावात ‘पाणीबाणी’; तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प, टँकरसाठी हजारोंचा खर्च

व्हीआयपी सवलत अन्आ र्थिक फायद्यासाठी लोगो

स्वतः अथवा कुटुंबातील कोणीही आमदार नसताना क्रेटा कारच्या काचेवर 'महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार' असा लोगो आणि अशोक स्तंभाचे चिन्ह लावल्याप्रकरणी वाहनचालकाविरोधात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपरी येथील गेलार्ड चौकात रविवार (दि. १३) ही कारवाई करण्यात आली. युवराज भरत बाबर (२८, रा. कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पिंपरी वाहतूक विभागाचे पोलिस अंमलदार अरुण कोल्हे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Fake MLA Logo
Pimpri Chinchwad ST Special Buses: कोकणच्या चाकरमान्यांसाठी एसटीची ‘गणेश’वारी; वल्लभनगर आगारातून ५८ विशेष बस धावणार!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेलार्ड चौकात वाहतूक पोलिस वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी बाबर याच्या क्रेटा कारच्या काचेवर 'महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार' असे लिहिलेले आणि अशोक स्तंभ असलेले चिन्ह निदर्शनास आले. चालकाने सीटबेल्टही लावलेला नव्हता. चौकशीदरम्यान व्हीआयपी सवलत आणि आर्थिक फायद्यासाठी लोगो लावल्याचे वाहनचालकाने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news