

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे व संतोष लोंढे याचा हा प्रभाग आहे. इच्छुकांची मोठी संख्या मोठी असल्याने भाजपाला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. त्याचा फायदा साहजीकच विरोधी पक्षांना होऊ शकतो. प्रभागात जुना व नवीन भागातील लोकवस्तीचा समावेश आहे.
भाजपाकडून माजी नगरसेवक नितीन लांडगे, संतोष लोंढे, माजी नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे, राष्ट्रवादी काँग््रेासमधून भाजपात आलेले जालिंदर शिंदे, दत्तात्रय गव्हाणे हे इच्छुक आहेत. पूर्वी भाजपात असलेल्या माजी नगरसेविका भिमाबाई फुगे यांनी राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये प्रवेश केला आहे. त्या राष्ट्रवादीकडून लढणार आहेत. तसेच, आशिष पठारे, विराज लांडे, निवृत्ती फुगे, उमेश भोंडवे, राणी पठारे, राजश्री जायभाय, वैदवंती वाबळे, सुनीता लांडगे, अनिकेत शिंदे, अमोल डोळस, साक्षी फुगे, विजय फुगे, अश्विनी फुगे, प्रज्योत फुगे, सुवर्णा फुगे आदी इच्छुक आहेत. इच्छुकांची संख्या सर्वाधिक असल्याने भाजपाला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. विरोधकांकडून बंडखोरांना संधी दिली जाऊ शकते.
प्रभागातील परिसर
शितलबाग, सेच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅण्डविक कॉलनी, खंडोबा माळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर आदी.
काही भागात कमी दाबाने पाणी
भोसरी गावठाणासह मध्य वस्तीतील दाट लोकवस्तीचा हा प्रभाग आहे. जुनी घर आणि नव्याने तयार झालेली घर यामुळे खूपच दाटीवाटीचा हा परिसर आहे. रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी समस्या नित्याची झाली आहे. रस्ते खड्डेमय असल्याने वाहनचालकाची गैरसोय होत आहे. दुकानदार, विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे अरुंद रस्ते आणखी अरुंद झाले आहेत. दिवसाड पाणी येत असल्याने प्रभागातील अनेक भागात कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे रहिवाशी त्रस्त आहेत. जागोजागी कचराचे ढीग दिसतात.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-ओबीसी
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
सिंगापूरच्या धर्तीवर मत्सालयाची उभारणी
भोसरी सहल केंद्रात सिंगापूरच्या धर्तीवर मत्यालय विकसित करण्याचे काम सुरू आहे. निधीमुळे दुसऱ्या टप्प्यातील काम संथगतीने सुरू आहे. जलतरण तलावाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तेथे व्यायामशाळाही बांधण्यात आली आहे. केंद्राच्या मागे 5 एमएलडीचा एसटीपी कार्यान्वित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण संकुलास तसेच, कबड्डी प्रशिक्षण केंद्रात खेळाडू घडविण्यात येत आहेत. भोसरी सर्व्हे क्रमांक 1 येथे उभारलेल्या नव्या इमारतीत इंग््राजी माध्यमाची शाळा सुरू आहे. पीएमटी चौकातील छत्रपती विद्यामंदिराची जुनी इमारत पाडून नवीन बांधण्याचे काम सुरू आहे. 80 हजार स्केअर फूट आकाराचे मैदान व बैठक गॅलरी विकसित केली आहे. प्रभागात काही ठिकाणी काँक्रीटचे रस्ते तयार केले आहेत. चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले असून, उड्डाण पुलाखाली हॉकर्स झोन तयार केला आहे. गव्हाणे वस्तीतील जुने भोसरी रुग्णालय पाडून नवजात शिशू व महिलांसाठी 245 बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्या विरोधात न्यालयात गेल्याने त्याचे काम सुरू करता आलेले नाही.