Andra Dam Water Project: पिंपरी-चिंचवडला आंद्रा धरणातून मिळणार आणखी १०० एमएलडी पाणी; २२० कोटींच्या डीपीआरला मंजुरी

भूमिगत जलवाहिनीद्वारे थेट धरणातून पाणी आणणार; निविदाप्रक्रियेचा मार्ग मोकळा, दूषित इंद्रायणीच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी होणार
Andra Dam
Andra DamPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: मावळ तालुक्यातील आंद्रा धरणातून थेट भूमिगत जलवाहिनीतून पाणी आणण्याच्या प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रक समितीने 220 कोटी रुपयांच्या विस्तृत आराखड्याला (डीपीआर) मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील प्रशासकीय अडथळा दूर झाला आहे. पाणीपुरवठा विभागासाठी निविदाप्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Andra Dam
Chikhali Illegal Construction: चिखलीतील २० अनधिकृत बांधकामांवर तूर्तास कारवाईला ‘ब्रेक’; सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

लवकरच प्रकल्पाची निविदा काढण्यात येईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराला अतिरिक्त 100 एमएलडी स्वच्छ पाणी मिळणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता महापालिकेने पाणीपुरवठा योजनांवर लक्ष केंद्रित केले आहे. शहरासाठी आंद्रा धरणातून अतिरिक्त 100 एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यासाठी भूमिगत जलवाहिनीसह इतर कामांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रक समितीने 220 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे.

Andra Dam
Pimpri Flyover Safety: पिंपरीतील फ्लायओव्हर धोक्याच्या छायेत; भिंतींना तडे, सैल प्लास्टर अन् झाडांच्या मुळांचा धोका

गेल्या काही वर्षांत हाैसिंग सोसायट्या आणि वाढत्या शहरीकरणामुळे शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे. साहजिकच, यामुळे पाण्याची मागणीही प्रचंड वाढली आहे. सध्या शहराला प्रामुख्याने पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे हा पुरवठा अपुरा पडू लागला होता. अनेक भागांत अपुरा आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होत होती.

Andra Dam
Pudhari Maval Gaurav: कर्तृत्ववानांचा ‘पुढारी मावळ गौरव’ने सन्मान; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा जल्लोषात गौरव

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे नियोजन केले होते. सद्य:स्थितीत पवना धरणातून 520 एमएलडी, आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलले जात आहे. तर, एमआयडीसीकडून 30 एमएलडी शुद्ध पाणी विकत घेतले जात आहे. आंद्रा धरणाचे पाणी थेट भूमिगत जलवाहिनीतून आणण्याचे नियोजन आहे. जॅकवेलचे काम पूर्ण होईपर्यंत महापालिका तळवडेजवळील निघोजे येथील इंद्रायणी नदीच्या बंधार्‍यावरून दररोज 95 एमएलडी अशुद्ध पाणी उचलत आहे. त्यावर चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते शहरात पुरविले जात आहे. इंद्रायणी नदीतील ते पाणी अतिदूषित असल्याने नागरिकांच्या त्या पाण्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. पाण्याचा रंग हिरवा असणे, वास येणे अशा तक्रारी आहेत. थेट धरणातून भूमिगत जलवाहिनीद्वारे पाणी आणल्याने ती समस्या सुटणार आहे.

Andra Dam
Prithika Pradeep Archery: पिंपरीच्या प्रिथिकाची आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी; सांघिक धनुर्विद्येत भारताला सुवर्ण पदक

आंद्रा धरणाचे पाणी भूमिगत जलवाहिनीतून आणण्यासाठी जॅकवेल उभारणीकरिता जलसंपदा विभागाने 95 गुंठे जागा मंजूर केली आहे. महापालिकेकडून जॅकवेल आणि भूमिगत बंदिस्त जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याकरिता 220 कोटी रुपयांची निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याशिवाय, शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी भामा-आसखेड धरणातून 167 एमएलडी पाणी भूमिगत जलवाहिनीद्वारे आणण्याचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news