Pimple Gurav Power Supply Issue: पिंपळे गुरवमधील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा थांबणार; महावितरणकडून जुनी केबल बदलण्याचे काम सुरू

१७ वर्षे जुन्या एलटी केबलऐवजी ३०० स्क्वेअर एमएमची नवीन केबल; वाढत्या वीज लोडमुळे घेतला निर्णय
Pimple Gurav Power Supply Issue
Pimple Gurav Power Supply IssuePudhari
Published on
Updated on

पिंपळे गुरव: महावितरणच्या वतीने पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक ते माऊली रसवंतीगृह समोरील मिनी फिडर पिलर दरम्यानची सुमारे १७ ते १८ वर्षे जुनी एलटी वीज केबल बदलण्याचे काम महावितरणकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. यामुळे पिंपळे गुरव परिसरात खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

Pimple Gurav Power Supply Issue
Kasarwadi Bal Shivaji Memorial: कासारवाडीत साकारतेय ‘बाल शिवाजी’ स्मारक; नोव्हेंबरमध्ये होणार भव्य लोकार्पण

सदर केबल मुख्य रस्ता क्रॉस करून जात असल्याने आणि वाढलेल्या विजेच्या लोडमुळे सतत तसेच गेल्या आठवड्यात दोन वेळा केबल फॉल्टी झाली होती. येथील चौकात सातत्याने वाहतुकीची वर्दळ सुरू असते. त्यामुळे येथील मुख्य रस्त्यावर काम करताना कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

Pimple Gurav Power Supply Issue
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिर; कोथिंबीर 30 रुपये जुडी, गवार-शेवगा महागच

येथील परिसरातील वाढता वीज वापर आणि लोड लक्षात घेऊन महावितरणचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंढे यांच्या निर्देशानुसार जुनी २४० स्क्वेअर एमएमची केबल काढून त्याऐवजी ३०० स्क्वेअर एमएमची ८० मीटर नवीन केबल टाकण्याचे कामकाज सुरू केले आहे. पिंपळे गुरव महावितरणचे सहाय्यक अभियंता संतोष पंचरस आणि कार्यकारी अभियंता सोमनाथ गिरी यांनी या कामासाठी विशेष पाठपुरावा केला होता.

Pimple Gurav Power Supply Issue
Pimpri Chinchwad Waterlogging: पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाळापूर्व तयारीचा दावा फोल? रस्ते, बसथांबे पाण्याखाली; नागरिकांची गैरसोय

रात्रीच्या कामामुळे नागरिकांनी घेतली पोलिस स्टेशनमध्ये धाव

आषाढी एकादशीच्या दिवशी (शनिवार) सकाळी १० वाजल्यापासून महावितरणने या कामाला सुरुवात केली होती. मात्र, शनिवारी रात्री १० नंतरही ब्रेकर मशीनद्वारे खोदकाम सुरूच राहिल्याने परिसरातील नागरिक आणि सोसायटीधारकांना खोदकामाच्या आवाजाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. अखेर त्रस्त नागरिकांनी सांगवी पोलिस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार केली. सदर तक्रारीची दखल घेत सांगवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रात्रीचे सुरू असलेले महावितरणचे कामकाज थांबवले. या वेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही पोलिसांच्या सूचनेचा आदर करत रात्रीचे कामकाज थांबवून रविवारी सकाळी १० वाजल्यापासून पुन्हा कामाला सुरुवात केली.

Pimple Gurav Power Supply Issue
Pimpri Chinchwad Mule Account Fraud: पंधरा दिवसांत ६० जणांवर म्युल अकाउंटचे गुन्हे; काही हजारांच्या आमिषाने नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात

रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आव्हान

सध्या रविवार रात्री १० वाजेपर्यंत हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी महावितरणचे पथक अथक परिश्रम घेत आहे. या संपूर्ण मोहिमेसाठी घटनास्थळी २ ब्रेकर मशीन, १० मजूर, २ महावितरण कर्मचारी आणि २ वरिष्ठ अधिकारी उपस्थित असून, काम वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news