Pimple Gurav Drainage Problem: पिंपळे गुरवमध्ये ड्रेनेज चेंबर खचले; ओंकार कॉलनीतील घरांत सांडपाणी

नळातून फेसयुक्त पाणी येत असल्याची तक्रार; १२ मीटरचा काँक्रीट रस्ता खोदण्याची वेळ, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Pimple Gurav Drainage Problem
Pimple Gurav Drainage ProblemPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपळे गुरव: येथील शिवरामनगर परिसरात रस्त्याखालील सुमारे ४० फूट खोल गटाराचे चेंबर खचल्याने जलनिस्सारणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या बिघाडामुळे मोरया पार्कमधील ओंकार कॉलनीतील घरांमध्ये आणि पॅसेजमध्ये सांडपाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चेंबरच्या दुरुस्तीसाठी तयार झालेला १२ मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रीट रस्ता खोदण्याची वेळ आल्याने महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Pimple Gurav Drainage Problem
Pimpri School Bus Inspection: पिंपरी-चिंचवडमध्ये स्कूलबस तपासणीत ४,२५१ वाहने दोषी; १.६७ कोटींचा दंड

रस्ता खोदाईमुळे नियोजनावर प्रश्नचिन्ह

चेंबर दुरुस्तीसाठी नव्याने तयार केलेला सिमेंट काँक्रीट रस्ता खोदावा लागणार आहे. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणापूर्वी भूमिगत जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या आणि चेंबरची स्थिती तपासली जात नाही का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार रस्ते खोदण्यामुळे सार्वजनिक पैशांचा अपव्यय होत असल्याची नाराजीही व्यक्त होत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सांडपाण्यामुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून, संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

Pimple Gurav Drainage Problem
Pimpri Diwali Lighting: दिवाळीसाठी पिंपरीच्या बाजारपेठा रोषणाईने उजळल्या; दिया कर्टन, सोलर लाइटिंगला मागणी

नळातून फेसयुक्त पाणी

ओंकार कॉलनीतील नागरिकांनी मोटर सुरू केल्यानंतर नळातून फेसयुक्त आणि दूषित पाणी येत असल्याची तक्रार केली आहे. पाण्याच्या टाक्या आणि बोअरवेल दूषित झाल्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाल्याने अनेक कुटुंबांना विकतचे पाणी आणावे लागत आहे.

चेंबरची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी

खचलेल्या चेंबरची तातडीने दुरुस्ती करून सांडपाणी वाहिनीचा प्रवाह सुरळीत करावा, घरांमध्ये साचलेले पाणी काढून परिसराचे निर्जंतुकीकरण करावे आणि पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, रस्ते काँक्रीटीकरणापूर्वी भूमिगत वाहिन्यांची तपासणी न झाल्याची चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. घरांत सांडपाणी शिरणे, पिण्याच्या पाण्याची चिंता आणि रस्ता खोदाईचे संकट अशा तिहेरी समस्यांना सामोरे जाणाऱ्या ओंकार कॉलनीतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासन काय उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pimple Gurav Drainage Problem
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरीत भाजीपाल्याचे दर कडाडले; शेवगा ८०, गावरान गवार १५० रुपये किलो

घरांत सांडपाणी; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

चेंबर खचल्यामुळे सांडपाण्याचा निचरा बाधित झाला असून, दूषित पाणी नागरिकांच्या घरांच्या आवारात साचले आहे. त्यामुळे नागरिकांना घरातील सांडपाणी बाहेर काढावे लागत आहे. तसेच, यामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली असून, डेंग्यूसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला आहे.

ओंकार कॉलनीमध्ये साचलेले पाणी मोटार पंपाच्या मदतीने काढणे सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हे काम पूर्ण होईल. पाईपमध्ये अनेक वर्षांपासून गाळ साचल्यामुळे पाणी परत येत होते. त्यामुळे तेथील सर्व पाईप बदलण्यात येणार आहेत. भविष्यात ही संपूर्ण ड्रेनेजलाईन बदलण्याचेही नियोजन आहे. या ठिकाणी बेसमेंट असल्यामुळे पाण्याची लेवल जुळवण्यात अडचण येत आहे. तसेच, सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वी बांधलेले चेंबर जुने झाल्यामुळे ढासळून आत पडले आहे, त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.

विजय कांबळे, उपअभियंता स्थापत्य विभाग, ह क्षेत्रीय कार्यालय

Pimple Gurav Drainage Problem
Illegal Arrest Procedure: अटकेतील कायदेशीर त्रुटींमुळे आरोपींना दिलासा; तपास अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्तालयाच्या सूचना

ओंकार कॉलनी येथे चेंबरचे पाणी काढण्यासाठी दिवसाआड गाड्या सुरू आहेत. तसेच, ह प्रभागाच्या वतीनेही पाणी काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

रमेश जिंतीकर, उपअभियंता स्थापत्य, ड क्षेत्रीय कार्यालय

मागील आठ ते दहा दिवसांपासून आमच्या घरात आणि पॅसेजमध्ये ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी साचत आहे. घरात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक आहेत. दुर्गंधीमुळे राहणे असह्य झाले आहे. नळाला फेसयुक्त पाणी येत असल्यामुळे पाणी विकत आणावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने हे सांडपाणी उपसून परिसर स्वच्छ करावा.

रेणुका पावले, गृहिणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news