Moshi Buffer Zone Illegal Construction: मोशी कचरा डेपोच्या बफर झोनमधील अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; ८ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

तीन एकरातील बेकायदा प्लॉटिंग, सुरक्षा कुंपण व खांब हटवले; चऱ्होलीतील महापालिका आरक्षणाची जागाही अतिक्रमणमुक्त
Moshi Garbage Depot
Moshi Garbage DepotPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोच्या परिसरातील 100 मीटर बफर झोनमध्ये अनधिकृत बांधकामे झाली आहेत. तसेच, प्लॉटिंग करून जागेची विक्री केली जात आहे. त्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून शुक्रवारी (दि.14) कारवाई करण्यात आली.

Moshi Garbage Depot
Pune Nashik Highway Traffic: पुणे-नाशिक महामार्गावर दोन तासांची कोंडी; २५ वर्षे घोषणाच, चाकणकरांचा संताप

हद्द कमी होऊनही नियम धाब्यावर ! ; मोशी कचरा डेपोलगतच्या बफर झोन परिसरातही दाट लोकवस्ती; बेकायदा प्लॉटिंगकडे महापालिका प्रशासनाचा काणा-डोळा असे ठळक वृत्त दैनिक पुढारीने बुधवारी (दि.12) प्रसिद्ध केले होते. त्याबाबत पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी सकारात्मक मते व्यक्त करत, बफर झोनमधील अतिक्रमणे हटवून, तेथे दाट वनीकरण करण्याचा सल्ला दिला आहे.

Moshi Garbage Depot
Maval Police Service Medals: मावळच्या तीन पोलिसांचा केंद्र शासनाकडून गौरव; वाघमारे यांना अति उत्कृष्ट, कसबेकर-गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक

त्या वृत्ताची तत्काळ दखल घेत ई क्षेत्रीय कार्यालयाने बफर झोनमधील अनधिकृत बांधकामांना नोटीसा बजावल्या आहेत. तसेच, तब्बल तीन एकर परिसरातील जागे विक्रीसाठी करण्यात आलेले जागेचे प्लॉटिंग आणि त्यासाठी उभे केलेले सुरक्षा कुंपन व खांब तोडून टाकण्यात आले. तसेच, नियोजित मोशी रुग्णालयाशेजारील 8 अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. तसेच, चर्‍होली येथील महापालिका आरक्षणाच्या जागेतील अतिक्रमणे हटवण्यात आले.

Moshi Garbage Depot
Pimpri Vegetable Rates: पिंपरीत भाज्यांचे दर कडाडले; आले ३०० रुपये किलो, कोबी-फ्लॉवरही महाग

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या आदेशानुसार पोलिस व एमएसएफ जवानांच्या बंदोबस्तात क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे यांनी ही कारवाई केली. यावेळी उपअभियंता महेंद्र देवरे, बीट निरीक्षक सुमित जाधव व अवधूत राऊत आदी उपस्थित होते.

Moshi Garbage Depot
Lonavala Tourist Crowd: लोणावळा हाऊसफुल्ल! भुशी धरणावर पाय ठेवायलाही जागा नाही; पर्यटनस्थळांवर तुफान गर्दी

अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई

शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर नियमितपणे कारवाई केली जात आहे. नागरिकांनी अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण करू नये. महापालिकेची बांधकाम परवानगी घेऊनच रितसर बांधकाम करावे. प्रतिबंधित बफर झोनमध्ये अतिक्रमण तसेच, बांधकाम करू नये. त्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल, असा इशारा क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news