FDA Medicine Inspection: बनावट औषधांचा साठा एफडीएकडून ताब्यात; महापालिकेच्या तक्रारीनंतर वायसीएम रुग्णालयात एफडीएची कारवाई

वायसीएम रुग्णालयातील औषधांचा साठा तपासणीसाठी; ११ प्रकारची औषधे गुणवत्तेत अपात्र
FDA Medicine Inspection
FDA Medicine InspectionPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर, पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात येथील औषध भांडारात बनावट औषधाचा साठा प्रशासनाकडून बाजूला काढून ठेवण्यात आला होता.

महापालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार तो साठा अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कडून शुक्रवारी (दि.२०) तपासणीसाठी नेण्यात आला आहे. तो जप्त केलेला नाही, असे महापालिका प्रशासनाने सांगितले. एफडीएकडून मिळालेल्या अहवालावरून औषध उत्पादन कंपनी व पुरवठादारावर महापालिकेने पूर्वीच कारवाई केलेली आहे.

FDA Medicine Inspection
Pimpri Metro: निगडी-पिंपरी मेट्रो मार्गावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांचा जीव धोक्यात

महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयाकडून १४ फेब्रुवारी २०२६ रोजी बी कॉम्प्लेक्स विथ झिंक या औषधांच्या गुणवत्तेबाबत रुग्णांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मोशी येथील एफडीएला पत्राद्वारे तो औषधांचा साठा तपासणीसाठी ताब्यात घेऊन त्याच्या वापरयोग्यतेबाबत अहवाल देण्याची विनंती केली होती.

तत्पूर्वी पालिकेने तो औषधांचा साठा वापरणे बंद करून, तो बाजूला साठा करून ठेवला होता. त्यानुसार, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी संबंधित औषधांचा नमुना तपासणीसाठी ताब्यात घेतला. त्या औषधांचा पुरवठा पुण्यातील श्रीविनायक फार्मामार्फत जेजुरी, एमआयडीसी येथील इंड्यूकेयर फार्मास्युटिकल्स ॲण्ड रिसर्च फाउंडेशन या उत्पादक कंपनीकडून करण्यात आला होता.

FDA Medicine Inspection
Pune Weather: तापमान वाढले, तरी पुणेकरांना हुडहुडी! संध्याकाळी ढगाळ वातावरण, रात्रीही थंडीचा अनुभव

त्यानंतर एफडीएकडून १६ जुलै २०२६ रोजी प्राप्त अहवालामध्ये बी कॉम्प्लेक्स विझ झिंक हे औषध गुणवत्तेच्या निर्धारित मानकांनुसार नसलेले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या अहवालाच्या अनुषंगाने महापालिकेने ८ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित उत्पादक कंपनीला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत समाविष्ट केले. औषधांचा पुरवठा करणाऱ्या श्रीविनायक फार्माला तीन वर्षांसाठी प्रतिबंधित केले आहे.

एफडीएकडून २७ जुलै २०२६ रोजी श्रीविनायक फार्माने पुरवठा केलेल्या १२ प्रकारच्या औषधांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ११ प्रकारची औषधे गुणवत्ता नसलेली असल्याचे तर, दोन औषधे गुणवत्ता मानकांनुसार असल्याचे महापालिकेस कळविण्यात आले.

त्यानुसार एफडीए कार्यालयाकडून ४ नोव्हेंबरला संबंधित ११ प्रकारच्या औषधांचा संपूर्ण साठा तपासणी व पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आला. त्या औषधांच्या साठ्याची एकूण किंमत ११ लाख ९५ हजार ८६३ रुपये आहे. त्यासाठी कोणतीही रक्कम महापालिकेने पुरवठादार व कंपनीस अदा केलेली नाही.

औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने एफडीएकडे तपासणीसाठी पाठपुरावा केला. प्राप्त अहवालाच्या आधारे संबंधित उत्पादक व पुरवठादाराविरुद्ध तीन वर्षांसाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले.

एफडीएकडून छापेमारी नाही

वायसीएम रुग्णालयातील औषधांच्या साठ्याबाबत एफडीएकडून कोणतीही छापेमारी करण्यात आलेली नाही. औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेत संबंधित औषधांचा साठा तपासणीसाठी एफडीएकडे पाठविला होता. औषधांच्या गुणवत्तेची खात्री करणे आणि रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे या उद्देशाने महापालिकेने ही कार्यवाही केली, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.