Pcmc News: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रभाग रचना तयार

32 प्रभागांचे नकाशे 22 ऑगस्टला होणार प्रसिद्ध
Pimpari-Chinchwad
Pimpari-Chinchwad File Photo
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चार सदस्यीय 32 प्रभाग रचनेचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. तो नकाशा मान्यतेसाठी नगर सचिव विभाग त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. प्रभाग रचना 22 ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रभाग रचना कशी असेल, याबाबत इच्छुकांसह माजी नगरसेवकांना उत्सुकता वाढली आहे.

फेब्रूवारी 2017 नंतर आत निवडणूक होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रभाग रचना कशी असणार, याबाबत तर्कविर्तक लढविले जात आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे त्याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. दरम्यान, महापालिका 12 मार्च 2022 पासून बरखास्त आहे. आयुक्त हे प्रशासक म्हणून 13 मार्च 2022 पासून संपूर्ण महापालिकेचे कामकाज पाहत आहेत.

Pimpari-Chinchwad
Crime News: वॉकी टॉकी वापरून दरोडा; पोलिसांनी 1200 किलोमीटर पाठलाग केला अन् अखेर पकडलेच!

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांचे पथक प्रभाग रचनेचे नकाशे तयार केले आहेत. प्रभाग रचना तळवडे-चिखली या भागांपासून सुरू होऊन सांगवी-दापोडी अशी उतरत्या क्रमाने करण्यात आली आहे.

शहराची सन 2011 ची जनगणना विचार घेऊन प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रगणक गट (ब्लॉक) जुळवून प्रभाग रचनेचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी गुगल अर्थ मॅपचा आधार घेण्यात आला आहे. आवश्यतेनुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणीही करण्यात आली आहे.

महापालिकेच्या समितीने तयार केल्या प्रभाग रचनेवर आयुक्त शेखर सिंह यांची स्वाक्षरी झाली आहे. आता प्रारूप प्रभाग रचनेचा नकाशा राज्य शासनाच्या नगर विभाग विभागाकडे शुक्रवारी (दि.1) पाठविला जाणार आहे. त्या विभागाकडून नकाशे राज्य निवडणूक आयोगास 6 ते 11 ऑगस्ट या कालावधीत सादर केला जाणार आहे. आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे 22 ऑगस्टला प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना घेतल्या जाणार आहे. त्या 28 ऑगस्टपर्यंत स्वीकारल्या जातील. त्यावर 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत सुनावणी घेतली जाईल. दरम्यान, नवीन प्रभाग रचना फेब—ुवारी 2017 च्या निवडणुकीनुसार असणार असल्याचे सांगितले जात आहे.

एक जुलैपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार

पिंपरी-चिंचवड शहराची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 17 लाख 29 हजार 359 आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात किमान 49 हजार आणि कमाल 59 हजार मतदार संख्येचा समावेश असणार आहे. त्यानंतर 15 वर्षांत लोकसंख्येत तसेच, मतदार संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरात 17 लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात मतदार संख्या वाढणार आहे. एक जुलै 2025 ची मतदार यादी महापालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार त्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाकडून मागविण्यात आल्या आहेत. मतदार याद्या प्राप्त झाल्यानंतर त्या प्रभागनिहाय फोडल्या जाणार आहेत. त्या मतदार याद्या विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना

  • चार सदस्यीय 32 प्रभाग

  • सन 2011 च्या जनगणनेनुसार 17 लाख 29 हजार 359 लोकसंख्या

  • मतदार यादी-1 जुलै 2025 पर्यंतची ग्राह्य धरणार

  • शहरात एकूण 17 लाख 751 मतदार

  • प्रभाग रचना 22 ऑगस्टला प्रसिद्ध होणार

निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रसिद्धी

पिंपरी-चिंचवड शहराचा 32 प्रभाग रचनेच्या मसुदा तयार झाला आहे. प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशा नगर विकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेला मान्यता मिळाल्यानंतर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल, असे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news