Property tax defaulters action
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील थकबाकीदार निवासी व बिगरनिवासी मालमत्ताधारकांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. तर, 34 हजार 22 जणांनी एकदाही कर भरलेला नाही. तब्बल 1 लाख 12 हजार 809 निवासी मालमत्ताधारकांकडे 310 कोटींचा थकीत कर आहे.
अशा थकबाकीदारांच्या कार, दुचाकी, टीव्ही, फ्रीज व घरातील महागड्या वस्तू जप्त करण्याची कारवाईची मोहिम हाती घेण्यात येणार आहे, असे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले. (Latest Pimpri News)
शहरात 7 लाख 31 हजार मिळकती
शहरात एकूण 7 लाख 31 हजार मिळकतींची नोंद आहे. त्यापैकी आत्तापर्यंत 4 लाख 26 हजार जणांनी मालमत्ताकराचा भरला आहे. मालमत्ता बिलासोबत थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस देऊनही वारंवार मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणार्यांवर कारवाई केली जात आहे. कर न भरल्यास मालमत्ताही जप्त करण्यात येणार आहे. तब्बल 1 लाख 12 हजार 809 निवासी मालमत्ताधारकांकडे 310 कोटींचा थकीत कर आहे.
त्यांच्याकडे 5 ते 10 वर्षांपासून थकबाकी आहे. शहरात 50 हजारांपेक्षा अधिक थकबाकी असणार्यांची संख्या 28 हजार 518 आहे. एक लाखाहून अधिक थकीत असणार्या मालमत्तांची संख्या 9 हजार 147 इतकी आहे. पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असणार्या व्यावसायिक मालमत्तांची संख्या 875 आहे. त्यातील थकबाकीदार निवासी मालमत्तांची कार, टीव्ही, फ्रीज व घरातील महागड्या वस्तू जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन कर भरल्यास सामान्य करावर 4 टक्के सवलत आहे. मोबाईलवरून सहज कर भरता येतो. त्यामुळे प्रत्येकाने आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी मालमत्ता बिलाशी जोडावा. जेणेकरून सर्व सुविधा घरबसल्या मिळू शकतील.
- अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, महापालिका
पाच किंवा 10 वर्षांपेक्षा अधिक काळ थकबाकी असलेल्या मालमत्तांधारकांवर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. मालमत्ता कर न भरल्यास मालमत्ताही जप्ती करण्याची कारवाई अटळ आहे.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, असे महापालिका