PCMC SSC Result 2026: पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांचा दहावी निकाल 88.59%; उर्दू माध्यम 97.87% सह अव्वल

स्मार्ट शिक्षण व उपक्रमांचे यश; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महापालिकेच्या 17 माध्यमिक मराठी शाळांचा एकूण निकाल 88.59 टक्के लागला आहे. तसेच उर्दू माध्यमाच्या 8 शाळांचा निकाल 97.87 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महापालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमांना या निकालातून यश मिळाल्याचे दिसून आले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Crime: थेरगावमध्ये प्रेमप्रकरणातून 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; चॉपरने सपासप वार

महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे तसेच प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी महापालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या 25 माध्यमिक शाळांमधून एकूण 2 हजार 925 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Pavana River Pollution: पवना नदी पुन्हा फेसाळली; थेरगाव परिसरात प्रदूषणाची तिसरी घटना

त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेला 2 हजार 909 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी 2 हजार 625 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 16 विद्यार्थी गैरहजर राहिले. तर 284 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालामध्ये 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे 93 विद्यार्थी, 85 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे 58 विद्यार्थी असून, 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 17 इतकी आहे. तसेच 22 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad SSC Result 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये दहावीचा निकाल 97.31%; मावळ तालुका 97.42% सह अव्वल

महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी स्मार्ट क्लासरूम, डिजिटल शिक्षण पद्धती, अनुभवी शिक्षकवर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विशेष अतिरिक्त तास, सराव परीक्षा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व प्रयत्नांचे सकारात्मक फलित यंदाच्या निकालातून दिसून आले आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या कठोर परिश्रमासोबतच शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाल्याची भावना शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे महापालिका प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासोबत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असून आगामी काळात शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Illegal Domestic Gas Cylinder Use: उपनगरांत घरगुती गॅसचा होतोय व्यावसायिक वापर; नियमांना हरताळ

महापालिकेच्या शाळांनी यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी केलेले कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाले आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भविष्यातही विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

रवी लांडगे, महापौर पिंपरी- चिंचवड महापालिका

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी यंदा मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि शिक्षण विभागाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे हे फलित आहे. आगामी काळातही शिक्षणाची गुणवत्ता अधिक वाढवून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणात सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.

ममता शिंदे,उपायुक्त, पिंपरी- चिंचवड महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news