Pimpri Property Tax Collection: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकर वसुलीसाठी ‘परफॉर्मर ऑफ द डे’ उपक्रम

८८६ कोटींची वसुली; अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत महापालिकेचा शेवटच्या टप्प्यात वेग वाढवण्याचा प्रयत्न
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: चालू आर्थिक वर्ष संपण्यास तीन दिवसांचा कालावधी बाकी असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने मालमत्ताकर वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त कर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी फरफॉर्मर ऑफ द डेची संकल्पना राबवून, महापालिकेच्या सोशल मीडिया पेजवर त्यांच्यासाठी विशेष अभिनंदनासाठी पोस्ट करून सन्मान केला जात आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची ही संकल्पना आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Women Bike Rally: पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांची भव्य बाईक रॅली; नारी शक्तीचा जल्लोष

महापालिकेच्या वतीने नागरिकांना मालमत्ताकर भरण्यासाठी ऑनलाईन तसेच, 18 विभागीय कार्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी व थकबाकीदारांनी कर भरावा यासाठी अभय योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत अंतर्गत विलंब दंडावर 90 टक्के सवलत दिली जात आहे. त्यामुळेच आत्तापर्यंत 886 कोटी रुपयांचा मालमत्ताकर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Akurdi Power Cut Issue: आकुर्डी, निगडी, चिंचवडमध्ये वारंवार वीज खंडित; नागरिक संतप्त

शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त कर वसूल व्हावा, या उद्देशाने 18 विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यासाठी फरफॉर्मर ऑफ द डेची संकल्पना राबविली जात आहे. या अंतर्गत एका दिवसात सर्वाधिक मालमत्ताकर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्याच्या नावासह, केलेली वसुली याची आकडेवारी महापालिकेच्या सर्व सोशल मीडिया पेजवर, व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करून अभिनंदन केले जात आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Lonavala Petrol Pump Assault: लोणावळ्यात ₹1 वादातून पेट्रोल पंपावर हल्ला; कर्मचाऱ्यांना मारहाण

जास्तीत जास्त कर वसुली करण्याचे आदेश

मालमत्ताकर वसुलीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने फरफॉर्मर ऑफ द डेची संकल्पना राबविण्यात येत आहे. 31 मार्चअखेर जास्तीत जास्त कर वसूल करण्याचे आदेश कर संकलन विभागाला दिले आहेत, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Talegaon Dabhade Committees Election: तळेगाव दाभाडे नगर परिषदेत समित्यांची बिनविरोध निवड

संबंधित अधिकाऱ्यांस आयुक्तांच्या हस्ते मिळणार बक्षीस

संकलन विभागाच्या 18 विभागीय कार्यालयातील अधिकार्यांनी जर सलग तीन दिवस सर्वाधिक कर वसुल केल्यास अशा अधिकार्यांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news