Pimpri Chinchwad Nominated Corporator: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवकांसाठी राष्ट्रवादीकडून 3 नावे

भाजपमध्ये नावांवरून मतभेद; आयुक्तांकडे मुदतवाढीची मागणी
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका सीमा सावळे तसेच, पक्षाचे कार्याध्यक्ष फजल शेख या तीन जणांची नावे आयुक्तांना सादर केली आहेत. तर, नावांवरून एकमत न झाल्याने सत्ताधारी भाजपाकडून मुदत वाढवून देण्याची विनंती आयुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यावरून भाजपामधील अंतर्गत घोळ आणि वाद पुन्हा चव्हाटावर आला आहे. महापालिकेतील नगरसेवक संख्याबळानुसार सत्ताधारी भाजपाचे 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 स्वीकृत नगरसेवक होणार आहेत. त्यानुसार 13 मार्चच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर स्वीकृत नगरसेवकांची नियुक्तीचा विषय आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Maval BJP Core Committee: पराभवानंतर मावळ भाजपचा मोठा निर्णय; कोअर कमिटी बरखास्त

स्वीकृत नगरसेवकांसाठी नावाची शिफारस बुधवारी (दि.4) दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांना केली होती. त्यानुसार विरोधी पक्षनेते भोईर यांनी तिघांची नावे आज आयुक्तांना सादर केली. त्यात महापालिका निवडणुकीत नवी सांगवी-पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक 31 मधून पराभूत झालेले पक्षाचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, इंद्रायणीनगर-गवळीमाथा प्रभाग क्रमांक 8 मधून पराभूत झालेल्या आणि भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या सीमा साळवे आणि पक्षाचे शहर कार्याध्यक्ष फजल शेख यांचा समावेश आहे. त्या तिघांचे अर्ज आयुक्तांनी वैध ठरवले आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Tukaram Maharaj Beej Sohala: देहूत संत तुकाराम महाराजांचा 378वा वैकुंठगमन सोहळा

दुसरीकडे, सत्ताधारी भाजपाकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी सात जणांची नावे अद्याप अंतिम झालेली नाहीत. नावांवर एकमत होत असल्याने पक्षाने आयुक्तांकडे एप्रिल महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. सत्तारूढ पक्षनेते शितोळे आणि पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी तसे पत्र आयुक्तांना दिले आहे. त्यावर आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. त्यावरून सत्ताधारी भाजपामधील अंतर्गत वाद आणि घोळ पुन्हा समोर आले आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad 24x7 Water Billing Issue: पिंपळे गुरवमध्ये 24x7 पाणी योजनेचा गोंधळ

महासभेत राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकांवर शिक्कामोर्तब होणार ?

आयुक्तांनी गटनेत्यांना दिलेल्या मुदतीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन जणांची नावे स्वीकृत नगरसेवक पदासाठी सादर करण्यात आली आहेत. मात्र, भाजपाकडून नावे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे येत्या 13 मार्चला होणार सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या तिघांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादीच्या तिघांसह भाजपाच्या 7 जणांचीही निवड एकाच वेळी व्हावी म्हणून तो विषय तहकूब करण्याचा निर्णय ऐनवेळी सत्ताधार्यांकडून घेतला जाऊ शकतो.

दोन वर्षांसाठी तिघांना संधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजितदादांच्या शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेनुसार मराठा, मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. आज सर्वत्र सुरू असलेल्या जातीभेद आणि द्वेष भावना पेटवण्याच्या प्रकाराला पक्षाचे या माध्यमातून चोख उत्तर दिले आहे. ते पद दोन वर्षांसाठी असणार आहे. त्यानंतर तिघांना एका वर्षांसाठी आणि शेवटच्या टप्प्यात 2 वर्षांसाठी तिघांना संधी दिली जाणार आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी 100 पेक्षा अधिक अर्ज पक्षाकडे आले होते. त्यातून ही निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून पंचवार्षिकमध्ये एकूण 9 जणांना स्वीकृत म्हणून संधी मिळणार आहे, असे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
PMRDA New Commissioner: पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजित चौधरी; डॉ. योगेश म्हसे यांची मंत्रालयात बदली

मुदतवाढ देण्याची आयुक्तांना विनंती

भाजपाकडे स्वीकृत नगरसेवक होण्याची इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यावर एकमत होत नसल्याने तसेच, पक्षाच्या प्रदेश कमिटीकडून नावांना अंतिम मान्यता अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांची नावे सादर करण्यास एप्रिल महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे, असे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे तसेच, भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.

सभागृहात 13 मार्चला निर्णय होईल

राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन जणांची नावे प्राप्त झाली आहे. भाजपाकडून नावे सादर करण्यासाठी मुदत मागण्यात आली आहे. येत्या 13 मार्चच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय विषयपत्रिकेवर आहे. त्याबाबत सभागृहाकडून निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news