PCMC Employees Diwali Bonus: पालिका कर्मचार्‍यांना बोनस देण्याचा मार्ग मोकळा

महासंघासोबत पाच वर्षांचा करारनामा करण्यास स्थायी समितीची मान्यता
PCMC
PCMCPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांना दरवर्षी दिवाळीचा बोनस व सानुग्रह अनुदान देण्यात येते. अधिकारी व कर्मचार्‍यांना 8.33 टक्के प्रथा बोनस आणि 25 हजार हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाते. त्यासाठी सन 2025-26 ते सन 2029-30 असे पाच वर्षांसाठी करारनामा करण्यास तसेच, त्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने दिवाळी प्रथा बोनस व सानुग्रह अनुदान देण्याबाबत पाच वर्षांचा करारनामा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, कामगार कल्याण मंडळाने स्थायी समितीसमोर तसा प्रस्ताव ठेवला होता.

PCMC
Amenity Space: अ‍ॅमिनिटी स्पेसच्या नियमात बदल

महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच, शिक्षण विभागासह वैद्यकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांनाही प्रथा बोनस व सानुग्रह अनुदान दरवर्षी दिले जाते.

त्यात 8.33 टक्के प्रथा बोनस आणि 25 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाते. या प्रस्तावाला समितीने उपसूचना दिली आहे. प्रथा बोसनसोबत 25 हजारांऐवजी 30 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची उपसूचना समितीने मंजुरी केली आहे. उपसूचनेसह तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठवला आहे.

PCMC
Rotavirus Vaccine Shortage: महापालिका रुग्णालयांमध्ये ‘रोटाव्हायरस’ लसीचा तुटवडा

62 कोटींहून अधिक होणार खर्च

दरम्यान, महापालिका आस्थापनावर सहा हजारांपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी आहेत. दिवाळी बोनसवर महापालिकेकडून गेल्या वर्षी 62 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news