Rotavirus Vaccine Shortage: महापालिका रुग्णालयांमध्ये ‘रोटाव्हायरस’ लसीचा तुटवडा

लस उत्पादक कंपन्यांकडून राज्य स्तरावरच पुरवठा विस्कळीत झाला आहे.
Rotavirus Vaccine Shortage
Rotavirus Vaccine ShortagePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह इतर रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लहान बालकांसाठी अत्यावश्यक असलेली ‘रोटाव्हायरस’ लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

लस उत्पादक कंपन्यांकडून राज्य स्तरावरच पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळणारा लसीचा कोटा थांबला आहे. स्थानिक पातळीवर महापालिकेकडे असलेला राखीव साठाही आता संपल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

Rotavirus Vaccine Shortage
Moshi Garbage Depot Accident: महिन्याभरातच आई-वडिलांचे छत्र हरपले; मृत कामगाराच्या पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

गेल्या काही आठवड्यांपासून साठा उपलब्ध नसल्याची माहिती मिळत आहे. नवजात बालकांना अतिसार (डायरिया) आणि निर्जलीकरणासारख्या गंभीर आजारांपासून वाचवणारी ही लस उपलब्ध नसल्याने गरीब व मध्यमवर्गीय पालकांना खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या महत्त्वाच्या लसीअभावी शहरातील शेकडो बालकांचे लसीकरण खोळंबले असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे.

केंद्र सरकारच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमानुसार, बालकांना जन्मानंतर ६ व्या, १० व्या आणि १४ व्या आठवड्यात रोटाव्हायरस लसीचे डोस तोंडाद्वारे दिले जातात. महापालिका रुग्णालयांमध्ये दर गुरुवारी होणाऱ्या नियमित लसीकरण सत्रांमध्ये ही लस मोफत दिली जाते.

Rotavirus Vaccine Shortage
Moshi Garbage Depot Accident: महिन्याभरातच आई-वडिलांचे छत्र हरपले; मृत कामगाराच्या पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

मात्र, गेल्या २ ते ३ आठवड्यांपासून अनेक केंद्रांवर ही लस उपलब्ध नसल्याने महापालिका दवाखान्यात येणाऱ्या मातांना लसीशिवाय रिकाम्या हाती परतावे लागत आहे. यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाचे नियोजित वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. वर्षभरात ९० हजार बालकांना लस देण्यात आली आहे.

रोटाव्हायरस लसीचा पुरवठा थेट राज्य सरकारकडून केला जातो. सध्या उत्पादनात काही तांत्रिक अडचणी आल्याने राज्यभरातच हा तुटवडा आहे. आम्ही वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत आहोत. लवकरच नवीन साठा उपलब्ध होण्याची शक्यता असून, त्यानंतर तातडीने प्रलंबित बालकांचे लसीकरण पूर्ण केले जाईल.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news