PCMC Corporator Expenses Controversy: पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘चहापान’ खर्चावर प्रश्नचिन्ह

नगरसेवक व समर्थकांच्या मागण्यांमुळे वाढता खर्च; प्रशासनावर ताण, नागरिकांची नाराजी वाढली
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: श्रीमंत असा नावलौकीक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक म्हणून मिरवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक वर्षे प्रयत्नाची पराकाष्टा केली जाते. एकदा का, महापालिका सभागृहात प्रवेश केला की, त्यांच्यासह नातेवाईकांच्या अपेक्षा वाढतात. आपल्या प्रभागातील विकासकामांपेक्षा महापालिका तसेच, क्षेत्रीय कार्यालयात तसेच, सार्वजनिक कार्यक्रमात रुबाब करण्यावर त्याचा भर दिसतो.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimple Gurav Illegal Hoardings: पिंपळे गुरवमध्ये बेकायदेशीर फ्लेक्सचा सुळसुळाट

अपेक्षा वाढल्याने काही नगरसेवकांसह त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, समर्थकही महापालिकेत चहापान आणि अल्पोहारासाठी कर्मचाऱ्यांना आदेश देत आहेत. प्रसंगी अरेरावी करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सन्मानीयांच्या आप्तेष्टांचे फुकटचे चोचले पुरवण्यात प्रशासन मश्गुल झाले असून, त्यावर मोठा खर्च होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Sangvi Water Supply Issue: सांगवीत पाणीटंचाईचा तडाखा; निगडी केंद्रातील बिघाडामुळे नागरिक हैराण

महापालिकेत अधिकारी म्हणून रुजू होण्यासाठी राज्यभरातील अधिकारी तीव्र इच्छुक असतात. त्यासाठी पडद्यामागे बरेच प्रयत्न केले जातात. त्याबरोबरीने महापालिकेत नगरसेवक होण्यासाठी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वप्न असते. बरीच मेहनत घेतल्यानंतर काहींना निवडणुकीत यश मिळते. महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केल्यानंतर साहजिकच त्यांचा रुबाब वाढतो. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्या सन्मानीयांचा यथायोग्य आदर व सन्मान केला जातो. त्यामुळे काही नगरसेवक हुरळून जात असल्याचे चित्र आहे.

नगरसेवकांसह त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय, समर्थक व कार्यकर्तेही महापालिका कारभारात हस्तक्षेप करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचा महापालिकेसह क्षेत्रीय कार्यालयात राबता वाढला आहे. चहा, कॉकीसोबत बिस्किट, मस्कापाव, शंकरपाळ्या, भजी अशा स्वादिस्ट व रूचकर खाद्यपदार्थाची ऑर्डर कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. त्यासाठी प्रसंगी कर्मचाऱ्यांवर अरेरावी केली जात असल्याचे काही घटनांवरून समोर आले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Housing Society Issues: पिंपरी-चिंचवडमध्ये सोसायटीधारक त्रस्त; मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर

नवखे नगरसेवक आणि नगरसेविकेचे नातेवाईक, कुटुंबीय, समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने महापालिकेत वावरत असल्याचे दिसून येत आहे. तळमजल्यापासून चौथ्या मजल्यापर्यंत नगरसेवकांचे संबंधित व्यक्ती कोणत्या ना कोणत्या विभागात दृष्टीस पडत आहेत. एकाच कामासाठी नगरसेवकांसह त्यांच्या कार्यकर्त्याचाही सातत्याने हस्तक्षेप होत असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचारी हैराण झाले आहेत. त्यांचे आदरातिथ्य करण्यात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा वेळ खर्ची पडत आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी अधिक वेळ प्रतिक्षा करत बसावे लागते.

तिसऱ्या मजल्याचे चहापान बिल स्थायी समितीकडे

महापालिका भवनात तिसऱ्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेते, गटनेते तसेच, विविध विषय समितीच्या सभापतीचे दालन आहेत. त्या प्रत्येक दालनातील चहापानाचा खर्च स्थायी समितीकडून केला जातो. चहापानावर दर आठवड्याला अंदाजे 50 हजार ते 75 हजार रुपये खर्च होत आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pune Metro Line 3 Progress: माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला गती; पीएमआरडीए ॲक्शन मोडमध्ये

नगरसेवकांच्या मानधनावर दरमहा 20 लाखांचा खर्च

महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या 15 जुलै 2027 च्या निर्णयानुसार राज्याती ब वर्ग महापालिकेच्या नगरसेवकांना मासिक मानधन 15 हजार रूपये निश्चित करण्यात आले आहे. अ वर्गातील महापालिका नगरसेवकांना 25 हजार आणि क आणि ड वर्ग महापालिकेच्या नगरसेवकांना 10 हजार रुपये मानधन आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ब वर्गात येथे. येथील नगरसेवकांना 15 हजार रुपये मानधन आहे. त्यात महापौरांसह सर्व पदाधिकारी व समिती सदस्यांचाही समावेश आहे. एका सभेला 100 रुपये भत्ता दिला जातो. अधिकाधिक चार सभा किंवा बैठकीचा एकूण 400 रुपये भत्ता दिला जातो. असे नगरसेवकाला जास्तीत जास्त एकूण 15 हजार 400 रुपये मानधन प्रत्येक महिन्यास अदा केले जाते. त्यासाठी प्रत्येक महिन्यास महापालिकेचा 20 लाख रुपये खर्च होतो.

सध्या धनादेशाद्वारे मानधन

सर्व 128 नगरसेवकांकडून आवश्यक कागदपत्रे न मिळाल्याने आरटीजीएसची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सर्व नगरसेवकांना धनादेशाद्वारे मानधन अदा केले जात आहे. आरटीजीएससाठी सर्वांची नोंदणी झाल्यानंतर प्रत्येक नगरसेवकास ऑनलाईन माध्यमातून मानधन वितरित केले जाईल, असे महापालिकेचे नगर सचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news