Farm Mechanisation: मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळले

नवलाख उंबरे परिसरात आधुनिक यंत्रांची विक्रमी मागणी; मजुरी महाग आणि मजूरअभावामुळे शेतकरी मशीनवर अवलंबून
Farm Mechanisation
Farm MechanisationPudhari
Published on
Updated on

नवलाख उंबरे: ग््राामीण भागात सध्या शेतीकामांसाठी कामगारांची मोठी टंचाई जाणवत आहे. दरवर्षी रब्बी हंगामात गहू, हरभरा, मक्याची पेरणी तसेच इतर मशागतीची कामे जोमात सुरू असतात; परंतु यंदा कामगार मिळत नसल्याने शेतकरी वर्ग यंत्रसामग््राीकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहे. ट्रॅक्टर, सीड-ड्रिल, रोटाव्हेटर, पावर टिलर, मल्टिपर्पज मिनी ट्रॅक्टर अशा आधुनिक यंत्रांची मागणी विक्रमी पातळीवर गेली आहे.

Farm Mechanisation
kharalwadi Contaminated Water Issue: खराळवाडी-गांधीनगर परिसरात दूषित पाणीपुरवठा; नागरिकांच्या आरोग्याला धोका

रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता

यंत्रांद्वारे कमी वेळात मोठ्या क्षेत्रात मशागत, पेरणी किंवा कापणी करणे शक्य होत असल्याने उत्पादकता वाढण्यास मदत होते. मात्र, यांत्रिकीकरण वाढल्याने परंपरागत शेती कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तरीसुद्धा सध्याच्या परिस्थितीत कामगार कमी व यंत्र अधिक हा प्रवाह सर्वत्र जाणवत असून, आगामी हंगामातही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Farm Mechanisation
Pimpri Chinchwad Ration Shop Malpractice: पिंपरी-चिंचवड रेशन दुकानदारांची धान्य लूट; परवाने रद्द करा – छावा मराठा युवा महासंघ

मजुरांच्या टंचाइला कंटाळून परिसरातील शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीपद्धतीला रामराम ठोकून यांत्रिकी शेतीचा पर्याय निवडला आहे. मजुरांची टंचाई आणि वाढत्या शेती खर्चामुळे अनेक शेतकरी शेतीपासून दूर जात असल्याचेही चित्र दिसत आहे. सध्या मजुरांची टंचाई, वाढता मजुरी खर्च आणि वेळेवर कामासाठी मजूर न मिळणे या सगळ्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकरी आता ट्रान्सप्लांटर मशीन, ट्रॅक्टर-चलित रोटाव्हेटर, हार्वेस्टर अशा अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून त्यांनी शेतीत आधुनिकता आणली आहे. परिणामी, खर्चही कमी होत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. शेतीच्या या यांत्रिक पद्धतीमुळे खर्चही कमी झाला आणि वेळेचीही मोठी बचत झाली आहे.

Farm Mechanisation
Pimpri Chinchwad Air Pollution Study: हवा प्रदूषण अभ्यासासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ७५ लाखांचा खर्च; एआरएआयची नियुक्ती

पीकचक्र पुढे ढकलले जाण्याचा धोका

याच अनुषंगाने शेतकऱ्यांनी यंत्रांचा वापर वाढवल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढणारे मजुरीचे दर, उपलब्ध कामगारांची संख्या घटत जाणे, तसेच वेळेवर कामगार न मिळाल्याने पीकचक्र पुढे ढकलले जाण्याचा धोका आहे. या सर्व समस्यांमुळे यंत्रांचा वापर ही काळाची गरज बनली आहे. मागील काही वर्षांत शेतीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले, तरी यंदाची परिस्थिती मात्र अपेक्षेपेक्षा अधिक झपाट्याने बदलताना दिसत आहे. ग््राामीण भागात परप्रांतीय कामगारांची संख्या घटली आहे. त्यामुळे पूर्वी सहज उपलब्ध होणारे मजूर आता मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना इच्छा नसतानाही यंत्रांवर अवलंबून राहावे लागत आहे.

Farm Mechanisation
Pimpri Chinchwad Bio Project: घरगुती कचऱ्यापासून बायो-सीएनजी प्रकल्पाची निविदा; 27 मेगा वॅट वेस्ट टू एनर्जी आराखडा तयार

कामगार मिळत नाहीत म्हणून पेरणी वेळेवर होत नाही. मजुरीही जास्त द्यावी लागते. त्यामुळे आम्ही आता मशीनवर अवलंबून राहणे सोयीचे वाटते. कमी वेळात जास्त काम होते.

राहुल पानसरे, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news