Mosquito Larvae: दहा हजार घरांत डासांच्या अळ्या

डेंगीपासून बचावासाठी घर, परिसरात पाणी न साचू देण्याचे आवाहन
Pimpri News
दहा हजार घरांत डासांच्या अळ्याFile Photo
Published on
Updated on

Mosquito larvae found in Pimpri houses

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील आतापर्यंत 6 लाख 14 हजार 855 घरांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात 10 हजार 607 घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. डेंगू व मलेरियाचा आजार रोखण्यासाठी नागरिकांनी घर आणि कामाच्या ठिकाणी व परिसरात पाणी साचू देऊ नये, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

शहरात औषध फवारणी

शहरात डेंगू व मलेरियाची रुग्णसंख्या वाढत आहे. महापालिका व खासगी रुग्णालयात त्या आजारांचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. डासांमुळे हे आजार होतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने डास निर्मूलनाच्या उपाययोजना अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. औषध फवारणीसह घरांची व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने, बांधकामस्थळांची पाहणी केली जात आहे. तसेच, जनजागृती आणि दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येत आहे. (Latest Pimpri News)

Pimpri News
Malnutrition: पिंपरी-चिंचवडमध्ये बाराशे कुपोषित बालकांची नोंद

26 लाख 27 हजार रूपयांचा दंड वसूल

एकूण 3 हजार 612 जणांना आणि आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर, 739 नागरिक व आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 26 लाख 27 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत केली जात आहे.

दरम्यान, डेंगी प्रतिबंधासाठी विविध जनजागृती उपक्रम घेतले जात आहेत. नियमित औषध फवारणी केली जात आहे. घरोघरी माहितीपत्रकांचे वितरण करण्यात येत आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती प्रशिक्षण दिले जात आहे. प्रभागस्तरावर विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जात आहेत.

बांधकामस्थळी अस्वच्छता

आरोग्य पथकामार्फत शहरातील तब्बल एकूण 6 लाख 14 हजार 855 घरांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात रोपाच्या कुंड्याच्या खालील प्लेट, फुलदाणीतील पाणी, फ्रीजच्या मागील भांडे, पाणी साठवलेले ड्रम व भांड्यांची आदींची केली जात आहे. त्यापैकी 10 हजार 607 घर आणि परिसरात डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.

एकूण 32 लाख 54 हजार 738 कंटेनर तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 हजार 512 कंटेनरमध्ये डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले आहे. तसेच, 1 हजार 385 भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण 1 हजार 734 बांधकामस्थळे व लेंबर कॅम्पची तपासणी करण्यात आली. त्या ठिकाणी अस्वच्छता व पाणी साचल्याचे निदर्शनास आले.

Pimpri News
Traffic Buddy Scam: ‘ट्रॅफिक बडी’त घुसखोरी करणार्‍या 163 भामट्यांना ‘ब्रेक’

डासांपासून असा करा बचाव

  • आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा

  • घरातील सर्व भांडी तसेच, ड्रॅम कोरडे करा

  • घर आणि परिसरात साचलेले पाणी काढून टाका

  • फुलदाणी, टाकी, टायर, रोपाच्या कुंड्याखालील प्लेट, नारळ्याच्या कवट्या, प्लास्टिक वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नका

डेंगू आणि मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून सर्व स्तरांतून उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीदेखील स्वच्छता राखावी. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस म्हणून पाळावा. डेंगी सदृश्य लक्षणे दिसल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा.

- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

डेंगी व मलेरियाचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून औषध फवारणी केली जात आहे. तसेच, जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेस सर्वतोपरी सहकार्य करावे.

- सचिन पवार, सहायक आयुक्त, आरोग्य विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news