Malnutrition: पिंपरी-चिंचवडमध्ये बाराशे कुपोषित बालकांची नोंद

शहरी भागात कुपोषितग्रस्तांचे प्रमाण वाढणे चिंतेची बाब
Malnutrition
पिंपरी-चिंचवडमध्ये बाराशे कुपोषित बालकांची नोंदPudhri File Photo
Published on
Updated on

Malnutrition in Pimpri-Chinchwad

पिंपरी: शहरात परिसरातील 361 अंगणवाड्यांमध्ये 1 हजार 261 बालके कुपोषित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात शासनाकडून अंगणवाड्या चालविल्या जात आहेत. यामध्ये पूर्व आणि पश्चिम अशा दोन गटात त्याची विभागणी करण्यात आली असून, शहरी भागात कुपोषित बालकांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

या बालवाड्यांत 3 ते 6 वयोगटात 25 हजार 806 बालके आहेत. त्यापैकी 1 हजार 261 बालके हे तीव्र आणि मध्यम अशा दोन्ही गटात कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. तर ग्रामीण भागात 375 कुपोषित आढळली आहेत. (Latest Pimpri News)

Malnutrition
Traffic Buddy Scam: ‘ट्रॅफिक बडी’त घुसखोरी करणार्‍या 163 भामट्यांना ‘ब्रेक’

शासनाच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत शहरी भागातील गर्भवती, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, तसेच सॅम-मॅम श्रेणीतील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोहीम हाती घेण्यात येते. त्यानुसार शहरातील 25 हजार 806 बालकांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यातून मध्यम कुपोषित 1 हजार 046 बालके आढळली आहेत, तर अतितीव्र कुपोषित श्रेणीतील 215 बालके आढळली आहेत. उर्वरित बालके निरोगी आहेत.

या तपासणी पथकात समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेवक यांचा समावेश करण्यात येतो. हे पथक घरोघरी जाऊन बालकांची तपासणी करते. आरोग्य विभाग आणि प्रमाणित उपकरणांच्या सहाय्याने नियोजनबद्ध पद्धतीने आरोग्य तपासणीची प्रक्रिया राबविण्यात येते. तसेच कुपोषण आणि मातांचे समुपदेशन केले जात आहे.

अंगणवाडी सेविका बालकांची सर्व माहिती, दैनंदिन अहवाल, नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजनांच्या नोंदी, लसीकरण यांसह दैनंदिन कामकाजाचा आढावा लिखित स्वरूपात ठेवण्यात येतो.

कष्टकरी, गोरगरिबांची मुले कुपोषित :

अंगणवाडीमध्ये येणारी बालके ही आर्थिक दुर्बल घटकातील, बिगारी काम करणारे, हातावरचे पोट असणार्‍या कुटुंबातील आहेत. अंगणवाडीमध्ये येणार्‍या सर्व बालकांना शासनाकडून पोषण आहार पुरविला जातो. हा आहार त्यांना अंगणवाडीमध्येच खाऊ घातला जातो. आहारातील पोषण मूल्य वाढवून मुलांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन अंगणवाडी सेविकावर असते.

Malnutrition
Lonavala Accident: लोणावळ्यात मोटारसायकल आणि पीएमपीएल बसच्या अपघात; एकाचा जागीच मृत्यू

बालकाच्या कुपोषणाचे प्रमाणात तीव्र आणि मध्यम स्वरुपात गणले जाते. त्यानुसार प्रत्येकाला योग्य तो आहार दिला जातो. जी कुपोषित बालके आहेत. त्यांना डॉक्टर व इतर आहार तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली ठेवण्यात येते.

- सुरेश टेळे, बालविकास प्रकल्प अधिकारी, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news