Maval Taluka ZP PS Election: मावळ तालुक्यात झेडपी–पंचायत समिती निवडणूक 5 फेब्रुवारीला

5 गट व 10 गणांसाठी मतदान; 243 केंद्रांवर होणार निवडणूक प्रक्रिया
Pune Jilha Parishad
Pune Jilha ParishadPudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ: राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 5 गट व पंचायत समितीचे 10 गण अशा 15 जागांसाठी 5 फेबुवारीला मतदान होणार आहे. 243 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तसेच 16 जानेवारीपासून वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.

Pune Jilha Parishad
Vadgaon Maval triple Murder Case: धामणे तिहेरी खून प्रकरणात 10 आरोपींना जन्मठेप

निवडणूक आयोगाने आज मंगळवार (दि. 13) जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गणांची निवडणूक प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असून, गुरुवार, दि. 5 फेबुवारी 2026 रोजी मतदान तर मंगळवार, दि. 7 फेबुवारी 2026 रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार असल्याची माहिती मावळ-मुळशी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.

Pune Jilha Parishad
PCMC Election Eve: मतदानपूर्व ‘रात्र वैऱ्याची’; छुप्या प्रचाराची शक्यता

निवडणूक कार्यक्रमानुसार 16 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध करणार असून, 16 ते 21 जानेवारी या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. 22 जानेवारी रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. 27 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. 5 फेबुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, 7 फेबुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.

Pune Jilha Parishad
PCMC Election Code Violation: महापालिका निवडणूक; आचारसंहिता उल्लंघनाच्या 56 तक्रारी

मावळ तालुक्यातील गट व गणनिहाय मतदारसंख्या

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय मतदारसंख्या निवडणूक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, मावळ तालुक्यात एकूण 2 लाख 316 मतदार असून, त्यामध्ये 1,02,082 पुरुष, 98,226 महिला व 8 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

Pune Jilha Parishad
PCMC Election Code Violation: महापालिका निवडणूक; आचारसंहिता उल्लंघनाच्या 56 तक्रारी

जि. प. गटनिहाय मतदारसंख्या

  • टाकवे बुद्रुक - 39,547

  • इंदुरी - 36,280

  • खडकाळे - 39,103

  • कुसगाव बुद्रुक - 39,611

  • सोमाटणे - 45,775

  • (एकूण मतदार : 2,00,316)

  • पं. स. गणनिहाय मतदारसंख्या

  • टाकवे बुद्रुक - 19,839

  • नाणे - 19,708

  • वराळे - 19,781

  • इंदुरी - 16,499

  • खडकाळे - 20,429

  • काळा - 18,674

  • कुसगाव बुद्रुक - 15,412

  • काळे - 24,199

  • सोमाटणे - 22,811

  • चांदखेड - 22,964

  • पंचायत समिती गणांमध्येही एकूण मतदारसंख्या 2,00,316 इतकीच आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news