पिंपरी येथे प्रेयसीवर चाकू हल्ला करून प्रियकराने जीवन संपविले

Pimpri Crime News | प्रेयसीवर रूग्णालयात उपचार सुरू
Pimpri stabbing incident
पिंपरी येथे लॉजवर प्रेयसीवर चाकू हल्ला करून प्रियकराने जीवन संपविले. File Photo
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: प्रेयसीवर चाकूने खुनी हल्ला चढवून प्रियकराने स्वतः गळफास घेऊन जीवन संपविले. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १०) दुपारी चारच्या सुमारास पिंपरी येथील एका लॉजच्या रूममध्ये घडली. प्रियकराने प्रेयसीवर नक्की कोणत्या कारणासाठी हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नितेश नरेश मिनेकर (वय ३४, रा. येरवडा) असे प्रियकराचे नाव आहे. या हल्ल्यात २८ वर्षीय तरुणी गंभीर जखमी आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रुममधून तरुणीच्या ओरडण्याचा आवाज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नितेश आणि त्याची प्रेयसी हे दोघे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपरीतील हॉटेलमध्ये आले. त्यांनी आपले आधारकार्ड दाखवून एक रूम बुक केली. रूममध्ये गेल्यानंतर काही मिनिटांतच रुममधून तरुणीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचारी पळत रूम समोर गेले. त्यांनी दरवाजा उघडण्याची विनंती केली. मात्र, कोणीही रूमचा दरवाजा उघडला नाही. कर्मचाऱ्यांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पुढच्या पाच मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहचले.

आम्ही पोलिस आहोत, दरवाजा उघडा

त्यांनी, दरवाजा वाजवत, आम्ही पोलिस आहोत, दरवाजा उघडा, असे सांगितले. त्यानंतर नितेश याने, पाच मिनिट थांबा, उघडतो दरवाजा, असे सांगितले. मात्र, काही वेळ जाऊनही दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला. तेंव्हा आत नितेशने फॅनला लटकून गळफास घेतल्याचे आढळून आले. तर, तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी तातडीने तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. लैंगिक अत्याचार केल्यानंतर हा हल्ला चढवला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.

Pimpri stabbing incident
पिंपरी: अपघातात बालकासह आईचा मृत्यू; कंटनेर-दुचाकीच्या धडकेत वडील गंभीर जखमी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news