Pimpri News: आधी रस्ते दुरुस्त करा; मगच महामेट्रोला निधी; स्थायी समितीचा आक्रमक पवित्रा

स्थायी समितीची सभा अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 6) झाली.
Pimpri News
Pimpri NewsPudhari
Published on
Updated on

पिंपरी: महामेट्रोकडून पिंपरी ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्यात निगडी येथील टिळक चौकात मेट्रोचे अतिरिक्त चौथे स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा तसेच, महापालिकेचा हिस्सा असे एकूण 50 कोटी रुपयांच्या निधी अदा करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीने तूर्तास रोखून धरला आहे.

शहरात मेट्रोच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची जोपर्यंत महामेट्रोकडून पूर्णपणे दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत पालिका तो निधी देणार नाही, अशी ठाम भूमिका स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी घेतल्याने मेट्रोच्या निधीचा पेच निर्माण झाला आहे.

Pimpri News
Pimpri pet license: केवळ 778 नागरिकांकडे श्वान परवाना; परवाना न काढण्यावर पालिकेकडून कोणतीही कारवाई नाही

स्थायी समितीची सभा अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 6) झाली. केंद्र सरकारने सुरुवातीला पिंपरी ते निगडी या 4.413 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेसाठी 910 कोटी 18 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती.

मात्र, राज्य शासनाच्या निर्णयानुसार निगडी येथे वाढीव चौथे मेट्रो स्टेशन उभारण्याचे निश्चित झाल्यामुळे या प्रकल्पाचा एकूण खर्च 960 कोटी 18 लाख रुपयांवर पोहोचला आहे. यातील 50 कोटींच्या अतिरिक्त खर्चात राज्य शासन आणि महापालिका प्रत्येकी 25 कोटी रुपयांचा वाटा उचलणार आहे.

या खर्चाच्या विषयाला सभेत मंजुरी मिळणे अपेक्षित होते, परंतु मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करत अध्यक्ष बारणे यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यास नकार दिला. तो प्रस्ताव सलग चार सभेत रोखून धरण्यात येत असून, तो तहकूब केला जात आहे.

55 टक्के काम पूर्ण

सध्या पिंपरी ते निगडी येथील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक या संपूर्ण मार्गिकेचे सुमारे 55 टक्के काम पूर्ण झाले आहे. हायाडक्टचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, हे काम करताना निगडी ते चिंचवड स्टेशन दरम्यान सर्व्हिस रस्ता आणि मुख्य रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.

Pimpri News
Pimpri Chinchwad Water Crisis: पिंपरी-चिंचवडमध्ये दूषित पाणीपुरवठ्यावरून सभेत संतापाचा उद्रेक; प्रशासनावर गंभीर आरोप

अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने आणि राडारोड्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

दररोज रात्री हाफकीन इन्स्टिट्यूट येथील ग््रेाडसेपरेटर बंद

पिंपरी ते स्वारगेट अशी मेट्रो धावत आहे. शहरात मेट्रो धावण्यास 6 मार्च 2022 ला सुरुवात झाली. मात्र, त्या मार्गावरील कामे अद्याप सुरूच आहेत. नाशिक फाटा मेट्रो स्टेशनचे तसेच, पादचारी मार्गाच्या कामासाठी मेट्रोकडून रात्री अकरानंतर पिंपरीहून कासारवाडीच्या दिशेने जाणारा ग््रेाडसेपरेटर रस्ता हाफकिन इन्स्टियुट येथे दररोज रात्री अकराला बंद करण्यात येत आहे.

त्यामुळे वाहनांची गर्दी होत असून, वाहनचालकांना सर्व्हिस रस्त्याने नाशिक फाटा चौकात जावे लागते. त्यात लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. ते काम 4 ते 5 महिन्यांपासून सुरू आहे. दररोज रात्री ग््रेाडसेपरेटर मार्ग बंद केला जात असल्याने संताप व्यक्त करण्यात आहे.

निधीच्या वितरणावर टांगती तलवार

या पार्श्वभूमीवर, विकासकामे महत्त्वाची असली तरी सर्वसामान्यांचे हाल आम्ही खपवून घेणार नाही. महामेट्रोने आधी त्यांचे दायित्व ओळखून खराब झालेले रस्ते तातडीने पूर्ववत करावेत. त्यानंतरच महापालिका आपला आर्थिक हिस्सा वर्ग करेल, अशा स्पष्ट शब्दांत अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी महामेट्रो प्रशासनाला सुनावले आहे. महापालिकेने सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी 60 कोटींची तरतूद केली असली तरी रस्ते दुरुस्तीच्या अटीमुळे आता या निधीच्या वितरणावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news