Pimpri pet license: केवळ 778 नागरिकांकडे श्वान परवाना; परवाना न काढण्यावर पालिकेकडून कोणतीही कारवाई नाही

परवाना काढण्यासाठी फक्त 75 रूपये शुल्क आकारले जाते. परवाना काढला नाही तर 500 रूपये दंड वसूल केला जातो.
Dog
Dog Pudhari
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी: महापालिकेने श्वान (कुत्रा) आणि मांजर पाळण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक केले आहे. तरीही शहरातील केवळ 778 नागरिकांनी श्वान तर 93 जणांनी मांजर पाळण्याचा परवाना घेतला असल्याचे समोर आले आहे.

परवाना न काढल्यास 500 रुपये दंडाची तरतूद

नागरिकांना महापालिका कार्यालयात येऊन परवाना घेण्याचा त्रास होऊ नये म्हणून 4 ऑगस्ट 2022 पासून ऑनलाइन श्वान परवाना सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सुरुवातीला याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि 2023 मध्ये 671 नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करुन परवाना प्राप्त केला. शहरात दहा हजारांहून अधिक पाळीव श्वान असताना फक्त 778 जणांकडेच वैध परवाना आहे.

Dog
Pimpri Police: पोलिस ठाण्याच्या दारातच न्याय! तीन महिन्यांत 6 हजार 26 जणांचे समाधान

परवाना काढण्यासाठी फक्त 75 रूपये शुल्क आकारले जाते. परवाना काढला नाही तर 500 रूपये दंड वसूल केला जातो. मनपाच्या पशूवैद्यकीय विभागाकडून मात्र, परवाना न काढणाऱ्या एकालाही दंड आकारण्यात आला नाही. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या अंदाजानुसार, शहरात दहा हजारांहून अधिक नागरिकांकडे श्वान आणि मांजर आहेत. त्यामुळे दिलेल्या आकडेवारीतून श्वान परवान्याबाबत नागरिकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

परवाना काढण्याकडे दुर्लक्ष

गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरात पाळीव श्वानांची संख्या लक्षणीय वाढली आहे, परंतु त्या तुलनेत महापालिकेत नोंदणी करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. शहरात गेल्या वर्षी 20 हजारांहून अधिक नागरिकांना श्वानांनी चावा घेतला आहे. श्वान पाळण्यासाठी नागरिकांना महापालिकेकडून परवाना घेणे बंधनकारक आहे.

Dog
Pimpri Chinchwad Water Crisis: पिंपरी-चिंचवडमध्ये दूषित पाणीपुरवठ्यावरून सभेत संतापाचा उद्रेक; प्रशासनावर गंभीर आरोप

असे असतानाही अनेक जण परवान्याकडे दुर्लक्षच करतात. एवढेच नव्हे तर श्वानांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना नियमितपणे लसीकरण करणे याकडेही दुर्लक्षच करीत असतात. त्यामुळे श्वानाची लाळ आणि त्याच्या चाव्यामुळे रेबीसच्या घटना घडत आहेत. शहरातील हजारो नागरिकांकडे महागडे श्वान आहेत.

तर, काहींकडे विदेशी श्वानदेखील आहेत. आता अशा मालकांनादेखील आपल्या श्वानाचा परवाना काढावा लागणार आहे. लाखो रुपये खर्च करून श्वान सांभाळूनदेखील काहीजण 75 रुपये खर्च करुन परवाना काढत नसल्याचे चित्र आहे.

श्वान परवाना काढण्यासाठी 75 रूपये शुल्क आकारले जाते. यासाठी श्वानांचा फोटो, लसीकरणाचा रिपोर्ट, मालकाचे आधार कार्ड लागते. परवाना नसेल तर 500 रूपये दंड आकारला जातो. परवाना काढण्याकडे खूप जण दुर्लक्ष करतात, यासाठी मोहीम राबवावी लागेल.

- डॉ. अरुण दगडे, पशू वैद्यकीय अधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news