Lonavala Rain: लोणावळा शहरात पावसाचे थैमान; 19 ऑगस्ट रोजी 24 तासात 432 मिमी पावसाची नोंद

मुसळधार पाऊस व सोबत वेगाने वाहणारे वारे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
Lonavala Rain
लोणावळा शहरात पावसाचे थैमान; 19 ऑगस्ट रोजी 24 तासात 432 मिमी पावसाची नोंदPudhari
Published on
Updated on

लोणावळा: घाटमाथ्यावरील पावसाचे आगार अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. 19 ऑगस्ट रोजी 24 तासात तब्बल 432 मिमी (17.01 इंच) पाऊस लोणावळा शहरामध्ये झाला आहे. मुसळधार पाऊस व सोबत वेगाने वाहणारे वारे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

लोणावळा शहरातील वलवण, नांगरगाव, बापदेव रोड, नारायणी धाम कडे जाणारा रस्ता, भद्रीविशाल सोसायटी, बस स्थानक रस्ता, शहाणी रोड, भांगरवाडी भागातील रस्ते, रायवूड भागातील रस्ते, बाजारातील रस्ते, नवीन पोलीस स्टेशनच्या समोरील रस्ता हे जलमय झाले असून वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते आहे. (Latest Pimpri News)

Lonavala Rain
Indrayani river flood: लोणावळा ग्रामीण परिसरामध्ये इंद्रायणी नदीला पूर

लोणावळा शहरातून वाहणारी इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली असून सर्व नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी रस्त्यांवर आल्याने रस्ते जलमय झाले आहेत. आज देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने लोणावळा शहरातील सर्व शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, महत्वाचे कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, हवामानातील बदलामुळे मुसळधार पाऊस सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे. कोठेही पाणी भरल्याची घटना घडल्यास लोणावळा नगर परिषद प्रशासनाला कळविण्यात यावे.

Lonavala Rain
Pimpri Rain Update: पिंपरीत पावसाचा धुमाकूळ! महापालिकेकडून शहरात पथके तैनात; अधिकारी तीन शिफ्टमध्ये काम करणार

लोणावळा परिसरातील धरणांमध्ये अद्याप पाणी साठविण्याची क्षमता शिल्लक असल्याने तूर्तास तरी लोणावळा शहरात पुराचा धोका नाही तरी देखील नागरिकांनी काळजी घ्यावी व जेथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, अशा ठिकाणी जाणे टाळावे तसेच झाडांच्या खाली उभे राहू नये. लोणावळा शहरात यावर्षी आज अखेरपर्यंत 4810 मिमी (189.37 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजपर्यंत 4514 मिमी (177.72 इंच) पाऊस झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news