Lonavala Old Police Station: लोणावळ्यातील जुन्या पोलिस ठाण्यावर दगडफेक; अधिकारी कक्षाच्या काचा फोडल्या

पूरस्थितीनंतर नवीन इमारतीत स्थलांतर; बंद असलेल्या पोलिस ठाण्याची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड, पुन्हा कार्यान्वित करण्याची तयारी
Lonavala Police Station Vandalism
Lonavala Police Station VandalismPudhari
Published on: 
Updated on: 

लोणावळा: लोणावळा शहरातील जुन्या पोलिस ठाण्यावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करत अधिकारी कक्षाच्या काचा फोडल्या आहेत. 6 जुलै रोजी लोणावळा शहरात मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्या पुराचा फटका पोलिस ठाण्यालादेखील बसला.

Lonavala Police Station Vandalism
Pimpri Chinchwad Ward Meetings: पिंपरी-चिंचवडमध्ये क्षेत्रसभा घेण्यास नगरसेवकांची टाळाटाळ; १२८ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार!

पोलिस ठाण्यातदेखील पाणी घुसल्याने लोणावळा बाजारातील पोलिस ठाण्याचे नवीन इमारतीमध्ये स्थलांतरण करण्यात आले होते. तेव्हापासून बाजार भागातील पोलिस ठाणे हे रिकामे होते. त्याठिकाणी पोलिस नाहीत याचा अंदाज घेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पोलिस ठाण्यावर दगडफेक करत अधिकारी कक्षाच्या काचा फोडल्या आहेत.

Lonavala Police Station Vandalism
Visapur Fort Cannonball: विसापूर किल्ल्यावर जमिनीत गाडलेला ऐतिहासिक तोफगोळा सापडला; पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द

लोणावळा बाजार भागातील वाहतूक कोंडी व त्या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या निमित्ताने जुने पोलिस ठाणे हे पुन्हा कार्यान्वित करत त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करणार असल्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी सांगितले होते. मागील दोन तीन महिन्यांपासून पोलिस ठाणे हे रिकामी असल्यामुळे त्याची साफसफाई व स्वच्छता करत लवकरात लवकर ते पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

Lonavala Police Station Vandalism
Children Type 2 Diabetes: मोबाईल, जंकफूडचा मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम; आठ वर्षांच्या चिमुकल्यांनाही टाइप-२ मधुमेहाचा धोका

ठाणे बंद असल्यामुळे पसरली अस्वच्छता

या अनुषंगाने पोलिस ठाण्याची पाहणी केली असता अधिकारी एक कक्षाच्या काचा कोणीतरी दगडफेक करून फोडल्याचे दिसून आले. सर्व कक्ष हे रिकामे पडल्यामुळे कचऱ्याने भरले आहेत. अधिकारी कक्षाच्या काचांवर ही दगडफेक नेमकी कोणी केली, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसली तरी झालेली घटना ही निंदनीय आहे.

Lonavala Police Station Vandalism
Pimpri Chinchwad Public Libraries: पिंपरी-चिंचवडमधील ग्रंथालये वाचकांविना ओस; ८१ हजारांहून अधिक पुस्तकांसाठी अवघे ७१२ सभासद!

पोलिस हे शहराचे व नागरिकांचे रक्षणकर्ते आहेत. त्यांच्यामुळेच शहरात कायदा व सुव्यवस्था राखली जाते. एखादे पोलिस ठाणे रिकामे आहे अथवा वापरात नाही म्हणून त्यावर दगडफेक करत त्या वास्तूच्या काचा फोडणे हे अतिशय दुर्दैवी व चुकीचा प्रकार असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.