Lonavala Nagar Parishad: लोणावळा नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी देविदास कडू बिनविरोध

राष्ट्रवादी सत्तेत असतानाही भाजपाला संधी; विकासासाठी सर्वपक्षीय एकत्रित भूमिका
Lonavala Nagar Parishad
Lonavala Nagar ParishadPudhari
Published on
Updated on

लोणावळा: लोणावळा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी आज झालेल्या पहिल्याच सभेमध्ये भाजपाचे देविदास भाऊसाहेब कडू यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे हे या सभेचे पीठासन अधिकारी होते. त्यांना सहायक म्हणून मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी काम पाहिले.

Lonavala Nagar Parishad
Maval Taluka ZP PS Election: मावळ तालुक्यात झेडपी–पंचायत समिती निवडणूक 5 फेब्रुवारीला

विहित कालावधीमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी देविदास कडू यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे नगराध्यक्ष सोनवणे यांनी घोषित केले. वास्तविक पाहता लोणावळा नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाची सत्ता असून 16 नगरसेवक व नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग््रेासचा आहे. मात्र, पक्षीय राजकारण न करता पदग््राहण सोहळ्याच्या दिवशीच आमदार सुनील शेळके यांनी सर्व पक्षांना एकत्र येत विकासासाठी सोबत राहण्याचे आवाहन केले. याच समीकरणानुसार अवघे चार नगरसेवक असलेल्या भाजपाला उपनगराध्यक्ष पद देत आमदार शेळके यांनी सर्व पक्षांना सोबत घेऊन पुढील पाच वर्षे लोणावळा शहरामध्ये विकास करणार असल्याचे दाखवून दिले आहे.

Lonavala Nagar Parishad
Vadgaon Maval triple Murder Case: धामणे तिहेरी खून प्रकरणात 10 आरोपींना जन्मठेप

स्वीकृत नगरसेवक करतानादेखील पक्षीय समीकरण न करता विकास आघाडी तयार करत त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग््रेासच्या कोट्यातून निखिल कवीश्वर यांना प्रथम संधी देण्यात आली आहे तर काँग््रेास व अपक्ष या आघाडीमधून मुकेश परमार यांना संधी देण्यात आली आहे.

Lonavala Nagar Parishad
Pimpri Makar Sankranti Market: मकर संक्रांतीनिमित्त पिंपरीत बाजारात महिलांची खरेदीसाठी झुंबड

राष्ट्रवादी काँग््रेास आघाडीकडून जाकीर खलिफा यांनादेखील स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली होती. मात्र कागदपत्रांमधील तांत्रिक त्रुटीमुळे ही निवड होऊ शकलेली नाही. राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचे लोणावळा शहरामध्ये 16 नगरसेवक निवडून आले आहेत. तर त्या खालोखाल भाजपाचे चार, काँग््रेास पक्षाचे तीन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक तर तीन अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. स्वीकृत नगरसेवकाची संधी संख्याबळानुसार राष्ट्रवादीला दोन व भाजपाला एक असे जाणार होती.

Lonavala Nagar Parishad
PCMC Election Eve: मतदानपूर्व ‘रात्र वैऱ्याची’; छुप्या प्रचाराची शक्यता

मात्र भाजपमधील अंतर्गत वादामुळे पक्षाचा गट स्थापन होऊ शकला नाही व याच संधीचा फायदा घेत काँग््रेास 2 व अपक्ष 2 यांनी एकत्र येत चार जणांची आघाडी स्थापन करत त्या माध्यमातून गट बनवत स्वीकृत नगरसेवक पद मिळवले आहे. निखिल कवीश्वर हे तब्बल तीन वेळा स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात दाखल झाले आहेत. त्यांनी स्वीकृत नगरसेवक पदाची हॅटट्रिक केली आहे. मुकेश परमार यांनी नांगरगाव प्रभागातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचेदेखील यानिमित्त पुनर्वसन झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news