Lonavala MD Case: लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल

अंमली पदार्थांचा साठा जप्त
Lonavala MD Case
Lonavala MD CasePudhari File Photo
Published on
Updated on

लोणावळा: लोणावळा परिसरात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. याच मोहिमेअंतर्गत लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करत तब्बल १ लाख ९३ हजार ९०० रुपये किमतीचे 'एमडी' (मेफेड्रॉन) हे अंमली पदार्थ जप्त केले असून, एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून २०२६ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास मॅकडोनाल्डस खालील वाहन पार्किंग परिसरात एक तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Lonavala MD Case
PCMC Regional Office Restructuring: पिंपरी-चिंचवड महापालिकेत 10 क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना; 1 जुलैपासून नवे आदेश लागू

स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार गणेश होळकर यांनी या ठिकाणी धाव घेतली. यावेळी रोहन शंकर साठे (वय २२, सध्या रा. गुरव वस्ती, कुसगाव, ता. मावळ; मूळ रा. आपटी गेव्हंडे, ता. मावळ) या तरुणाची झडती घेतली असता, त्याच्याकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत अंमली पदार्थ आढळून आला.

अंमली पदार्थांचा साठा जप्त

पोलिसांनी रोहन साठे यांच्याकडे असलेल्या पदार्थाची तपासणी केली असता, त्यात १९ ग्रॅम ३९ मिलीग्रॅम वजनाचे 'एमडी' (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ मिळून आला. या जप्त केलेल्या अंमली पदार्थाची बाजारपेठेत किंमत १ लाख ९३ हजार ९०० रुपये इतकी आहे.

Lonavala MD Case
PCMC Standing Committee Expenses Approval: पिंपरी-चिंचवड महापालिकेत आलिशान वाहन खरेदी व कोट्यवधी खर्चांना मंजुरी; स्थायी समितीत गोंधळ

रोहन साठे याच्यावर अंमली पदार्थ विक्रीचा उद्देश आणि बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कलम ८(क), २२(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक (मपोसई) गव्हाणे करत आहेत. या कारवाईमुळे मावळ परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, लोणावळा शहरांमध्ये एमडी पावडर, गांजा, चरस अशा अमली पदार्थांची विक्री होत आहे. यावर कडक कारवाई करत तरुणाईला या अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढणे यासाठी पोलीस प्रशासन सातत्यपूर्ण कारवाया करणार आहे. अमली पदार्थ तस्करांची कोणत्याही परिस्थितीमध्ये गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news