Lonavala Ganeshotsav DJ Ban: लोणावळ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेला ‘नो एंट्री’; लेझर लाईट वापरल्यास गुन्हा दाखल

गणेश मंडळांच्या बैठकीत पोलिसांचा इशारा; मिरवणुकीसाठी वेळापत्रक निश्चित, गुलाल टाळण्याचे आवाहन, समाजोपयोगी मंडळांना नगर परिषदेचे बक्षीस
Ganeshotsav
GaneshotsavFile Photo
Published on
Updated on

लोणावळा: गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे वाजविण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच, लेझर लाईटचा वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. त्यामुळे कोणत्याही मंडळाने लेझर लाईटचा वापर करू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी केले.

Ganeshotsav
Pimple Gurav Kasarwadi Road Accident: पिंपळे गुरव-कासारवाडी रस्ता चिखलाने निसरडा; १३ ते १४ वाहनांचे अपघात, नागरिकांचा संताप

सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि कोणत्याही तक्रारीविना पार पडावा, यासाठी लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या वेळी ते बोलत होते. बैठकीत नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, पोलिस निरीक्षक सचिन पाटील, वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी काळे, लोणावळा नगर परिषदेचे अधिकारी तसेच विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत गणेशोत्सवातील मिरवणूक, वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा, मंडप परवानगी, विसर्जन, लेझर लाईट, डीजे, गुलालाचा वापर तसेच सामाजिक उपक्रम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Ganeshotsav
Pimpri Chinchwad Illegal Construction: पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर धडक कारवाई; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाचा बडगा

पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले, की यावर्षी कोणत्याही तक्रारीविना गणेशोत्सव साजरा करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळे आणि प्रशासनाने परस्पर सहकार्याने काम करावे. वाहतूक कोंडीचा विचार करून मंडप उभारणीसाठी खूप आधीपासून परवानगी दिली जाणार नाही. मंडळांनी सामाजिक समस्यांचा विचार करून उत्सवाचे आयोजन करावे आणि नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

लोणावळ्यात नंबरप्रमाणे गणेशोत्सव मिरवणूक काढण्याची परंपरा ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विसर्जनाच्या सहाव्या दिवशी होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. बॅरिकेटिंग करून वाहतुकीला शिस्त लावण्यात येईल. तसेच, अनंत चतुर्थीच्या दिवशी मुख्य विसर्जन मिरवणूक सोहळ्यात प्रत्येक चौकात संबंधित गणेशोत्सव मंडळ किती वाजता पोहोचेल याचे वेळापत्रक निश्चित केले जाणार असून, सर्व मंडळांना ते वेळापत्रक पाळावे लागेल, असे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

Ganeshotsav
Pimpri Chinchwad Eid Milad Traffic: ईद-ए-मिलादनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठे बदल; १२ तास मार्ग बंद, पर्यायी मार्गांचा वापर करा

गुलालाचा वापर टाळावा

गणेशोत्सव मनोभावे आणि समाजाच्या हितासाठी साजरा करावा, गुलालाचा वापर टाळावा, असेही त्यांनी आवाहन केले. दंगलसदृश परिस्थिती किंवा विटंबनेचे प्रकार घडू नयेत, यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही सतर्क राहावे, असे त्यांनी सांगितले.

समाजोपयोगी गणेशोत्सवासाठी नगर परिषदेचे बक्षीस

नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी आपणही गणेश मंडळाचा कार्यकर्ता असल्याचे सांगत मंडळांनी काही पथ्य पाळून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. गुलालाचा वापर कमी करावा, लेझर लाईटचा वापर करू नये आणि डीजेचा वापरही कमी करावा, असे त्यांनी सांगितले. लोणावळा नगर परिषदेच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा सोनवणे यांनी केली.

मंडळांकडून विविध सूचना

बैठकीत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही विविध समस्या आणि सूचना प्रशासनासमोर मांडल्या. राजू बोराटी यांनी इंद्रायणी नदी स्वच्छ करून पूर्वीचा घाट पुन्हा गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुरू करण्याची मागणी केली. तसेच, विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील वाहने आधीच बाजूला करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. ओंकार तरुण मंडळाने गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीला उशीर होत असल्याने अनेक मंडळांना रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीत थांबावे लागत असल्याचे सांगितले. मावळा पुतळा चौकात पोहोचेपर्यंत रात्रीचे अकरा वाजत असल्याने पुढे वाद्य बंद करून मिरवणूक पुढे नेली जाते. त्यामुळे यंदा रांगेत उभे न राहता दुपारीच मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

Ganeshotsav
Pimpri Chinchwad Minor Road Accidents: पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीनांच्या हातात दुचाकी जीवघेणी; ३२ महिन्यांत ५५ जणांचा अपघाती मृत्यू

मंडळांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन

एकूणच, यंदाचा गणेशोत्सव शिस्त, सुरक्षितता, सामाजिक बांधिलकी आणि वेळेचे नियोजन या चार मुद्द्यांवर केंद्रित करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. पोलिस प्रशासन, नगर परिषद, वीज वितरण विभाग आणि मंडळांनी समन्वयाने काम केल्यास उत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी, गैरप्रकार आणि प्रशासनावरील ताण कमी करण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मानाच्या पहिल्या गणपतीची मिरवणूक दुपारी ३ वाजता

मंडळांच्या सूचनांचा विचार करून पोलिस प्रशासन आणि नगर परिषद काम करत असल्याचे माजी उपनगराध्यक्ष विलास बडेकर यांनी सांगितले. लोणावळ्याची वेळेची परंपरा कायम ठेवत यंदाही मंडळ मिरवणूक वेळेत काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोणावळ्याचा मानाचा पहिला गणपती यंदा १०० वर्षे पूर्ण करीत असून, मिरवणूक भव्य-दिव्य असेल. मात्र, ती कायद्याच्या चौकटीत आणि निर्धारित वेळेत काढली जाईल, असे बडेकर यांनी सांगितले. मिरवणुकीमध्ये बिभित्सपणा होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. दुपारी ३ वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यात येणार असून, यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

वीज वितरण कंपनीकडून व्यवस्था

वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी काळे यांनी गणेशोत्सव आनंदात पार पडावा आणि वीजपुरवठ्यामुळे कोणतेही विघ्न निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक काळजी घेतली जाईल, असे सांगितले. गणेश मंडळांच्या कामासाठी एक कर्मचारी पूर्णवेळ नियुक्त करण्यात येणार असून, रस्त्यावरील लोंबकळणाऱ्या वीजतारा ओढून घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वेळ पाळली जात नसल्यामुळे विसर्जनाला उशीर

तुफान मित्र मंडळानेही मिरवणुकीत मंडळांकडून वेळ पाळली जात नसल्यामुळे विसर्जनाला उशीर होत असल्याचे निदर्शनास आणले. पूर्वी मिरवणुकीत ढोल पथकांना प्राधान्य होते. मात्र, आता विविध खेळ आणि कार्यक्रमांमुळे मिरवणुकीचा वेग कमी होत असल्याचे मंडळाने सांगितले. रोहिदास तरुण मंडळाने मान्सूनलेक परिसरात अनेक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याचे सांगून त्या दिवशी त्या परिसरात पोलिस बंदोबस्त, वाहतूक नियोजन आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याची मागणी केली. विसर्जन मिरवणूक अधिक नियोजनबद्ध आणि वेळेत पार पडण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशी मागणी प्रशांत पुराणिक यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news