Lonavala Shop Theft: लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री पाच दुकाने फोडली; १६ हजारांची रोकड लंपास

साधना कॉम्प्लेक्समध्ये पहाटे तीनच्या सुमारास चोरी; दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, व्यापाऱ्यांमध्ये चिंता
Lonavala Shop Theft
Lonavala Shop TheftPudhari
Published on: 
Updated on: 

लोणावळा: लोणावळा शहरातील साधना कॉम्प्लेक्स परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री पाच दुकानांचे शटर अर्धवट उचकटून रोख रक्कम चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि. १६) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत चोरट्यांनी एकूण १६ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली असून, याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lonavala Shop Theft
Pimpri Chinchwad Dengue Cases: थंडी सुरू, तरी डासांचा डंख कायम! पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचे ३३ रुग्ण पॉझिटिव्ह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधना कॉम्प्लेक्स येथील रायबा मेन्स वेअर, प्रिंट वन साईज अँड डिजिटल बोर्ड, कुर्ती हाऊस, ब्लू लेडी आणि कॉपर वुड मेन्स वेअर या पाच दुकानांचे शटर अर्धवट उचकटून चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुकानांमधील रोख रक्कम चोरून नेली.

Lonavala Shop Theft
Pimpri Chinchwad Pet License: पिंपरी-चिंचवडमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाळीव प्राणी विनापरवाना; ७५ रुपयांच्या शुल्काकडे मालकांची पाठ

या चोरीमध्ये रायबा मेन्स वेअर दुकानातून ५ हजार रुपये, प्रिंट वन साईज अँड डिजिटल बोर्ड दुकानातून ७०० रुपये, कुर्ती हाऊस दुकानातून १ हजार ५०० रुपये, ब्लू लेडी दुकानातून १ हजार रुपये, तर कॉपर वुड मेन्स वेअर दुकानातून ८ हजार रुपये अशी एकूण १६ हजार २०० रुपयांची रोकड चोरीला गेली आहे.

Lonavala Shop Theft
Pimpri Chinchwad Encroachment Removal: पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या ६३ जागा अतिक्रमणमुक्त होणार; आयुक्तांचे कठोर आदेश

व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

याप्रकरणी प्रीतम भरत ओसवाल (वय ३४, रा. निसर्गनगरी सोसायटी, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (४), ३ (५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २८६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

Lonavala Shop Theft
Black Crab Price: चिंचवडच्या बाजारात काळ्या खेकड्यांची धूम; जम्बो खेकड्यांचा भाव १२०० रुपये किलो!

या घटनेचा पुढील तपास हवालदार फटांगडे करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेणे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. सलग पाच दुकानांना लक्ष्य केल्याने साधना कॉम्प्लेक्स परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.