Pudhari Impact: शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर अनधिकृत शाळांची यादी जाहीर; यात तुमच्या मुलांच्या शाळेचा समावेश तर नाही ना?

उशिरा यादी जाहीर केल्याने या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
schools news
शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर अनधिकृत शाळांची यादी जाहीर; यात तुमच्या मुलांच्या शाळेचा समावेश तर नाही ना?File Photo
Published on
Updated on

पिंपरी: शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली असून, शहरात इंग्रजी माध्यमांच्या 6 अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. मात्र, उशिरा यादी जाहीर केल्याने या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

पालिकेकडून वारंवार सूचना करूनही अद्याप काही शाळांनी मान्यता मागविण्यात टाळाटाळ केल्यामुळे या शाळांना अनधिकृत ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या शाळांमध्ये पालकांनी पाल्याचा प्रवेश करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी केले आहे. (Latest Pimpri News)

schools news
Vaishnavi Hagawane Case: हगवणेच्या गावाला पिंपरी-चिंचवडपोलिसांचे वावडे

दरम्यान, 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण सुरू होते. त्यातून शहरात 6 इंग्रजी माध्यमांच्या अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये. तसेच, या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणार्‍या नुकसानीस पालक स्वत: जबाबदार राहतील, असे प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी सांगितले आहे.

schools news
Pimpari Chinchwad: कुंडमळ्यावर पर्यटकांसह चोरांचीही गर्दी! पोलिस मात्र सुस्तच...

'या' आहेत अनधिकृत शाळा

1) ज्ञानराज विद्या प्राथमिक शाळा कासारवाडी

2) स्टारडम इंग्लिश स्कूल चर्‍होली

3) लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चिंचवडेनगर

4) ओरॅकल इंग्लिश मीडियम स्कूल चर्‍होली

5) प्रीती इंग्लिश मीडियम स्कूल

6) द होली मिशन इंग्लिश मीडियम स्कूल नवी सांगवी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news