

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 29) गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर कमी झालेले दिसून आले. मेथी 20 ते 30 रुपये जुडी, तर इतर पालेभाज्यांची जुडी 20 रुपयांना होती. कोथिंबीर 10 ते 20 रुपये जुडी तर हिरवी मिर्ची 80 रुपये किलो दराने विकली गेली. तर, फळभाज्यांमध्ये पावटा, गवार, बिन्सचा दर 140 रुपये किलो होता. इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत.
बाजारात कांदा, लसूण, बटाटे यांचे दर स्थिर आहेत. लसूण 80-100 रुपये किलो तर कांदा आणि बटाटा शंभर रुपयांना 4 किलो दराने मिळत होता. टोमॅटो 25 रुपये तर आले 60 रुपये प्रति किलो होते. (Latest Pimpri News)
पिंपरी बाजारातील फळभाज्यांचे किलोचे दर पुढील प्रमाणे : गवार 120 रुपये, शेवगा 80, टोमॅटो 20-25, भेंडी 80, फ्लॉवर 80, कोबी 60, मिरची 80, गाजर 70, शिमला 80, लसूण 80-100, आले 60, वांगी 60, काकडी 50, कारले 80, कांदे 20, बटाटा 35, बिन्स 140, रताळी 60, लाल भोपळा 80, घोसाळी 60, लिंबू 100, दोडका 120, तोंडली 80, आवळा 80, बीट 40, दुधी 50.
पिंपरी बाजारातील दर पालेभाज्यांचे प्रति जुडी
कोथिंबीर 20-30 रुपये, मेथी 30, पालक 30, शेपू 30, पुदिना 15, मुळा 30, लालमाठ 30, कांदापात 30, करडई 20, आळू पाने 60.
किरकोळ बाजारातील फळ भाज्यांचे किलोचे दर
बीट 70 रुपये, वाल 150, दोडका 150, कारली 100, भरताची वांगी 70, तोंडली 80-100, घोसळे 80, पडवळ 80, भोपळा 60, पापडी 100, बीन्स 160, परवल 60 ते 70, तोतापुरी 100, आवळा 100, रताळी 80, सुरण 100, मद्रासी काकडी 70, आरबी 100, फ्लॉवर 100, कोबी 80.
मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रुपये)
कांदा 12, बटाटा 15, लसूण 65, आले 45, भेंडी 75, गवार 85, टोमॅटो 15, वाटाणा 140, घेवडा 65, दोडका 55, हिरवी मिरची 45, दुधी भोपळा 35, काकडी 25, कारली 45, गाजर 25, फ्लॉवर 40, कोबी 20, वांगी 35, ढोबळी 45, बीट 35, शेवगा 75.
कांदा 509, बटाटा 786, आले 45, लसूण 36, भेंडी 62, गवार 22, टोमॅटो 409, वाटाणा 1, घेवडा 27, दोडका 33, हिरवी मिरची 124.
सीताफळांची आवक वाढली
पिंपरी फळ बाजारात सीताफळांची आवक वाढलेली दिसून आली. सध्या सीताफळ शंभर रुपये किलो दराने विकले जात आहे. पावसामुळे इतर फळांची आवकदेखील कमी झाली आहे. पाउस पडल्यानंतरही बाजारात आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीस आला होता. पावसामुळे आंब्याचे दरदेखील कमी झाले आहेत. फळ बाजारात सिमला येथील नाशपती, आलुबुखार आणि पिअर यांची आवक झाली आहे.
फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे
सफरचंद 260 रुपये, मोसंबी 120, संत्री 160, डाळिंब 200, पेरू 100, अंजीर 200, पपई 50-60, कलिंगड 30, आंबा बदाम 100, लालबाग 100, कर्नाटक हापूस 100, रत्नागिरी देवगड हापूस 200, दशेरी 100, लंगडा 120, केळी 50-60, अननस 120 प्रतिनग, पिअर 200, ड्रॅगनफ्रुट पांढरे 200, किवी 140, जांभुळ 160, लिची 200, नाशपती 100, आलुबुखार 200, पिअर 160.