Kasarwadi Storm Water Work: बॅरिकेड, रिफ्लेक्टर नाही; कासारवाडीत रस्त्याच्या कामासाठी ‘टेडी बिअर’ बनला सुरक्षारक्षक!

स्ट्रॉम वॉटर लाईनच्या कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा अनोखा ‘सेफ्टी जुगाड’; नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Teddy Bear Safety Jugaad
Teddy Bear Safety JugaadPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: रस्त्यावर काम सुरू आहे… नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरिकेड असायला हवे, रिफ्लेक्टर असायला हवा, धोक्याचा इशारा देणारे रिबन असायला हवे. पण कासारवाडीतील कचरा संकलन केंद्राबाहेर सुरू असलेल्या स्ट्रॉम वॉटर लाईनच्या कामाच्या ठिकाणी हे सगळे बाजूला पडले आणि चक्क लाल रंगाचा 'टेडी बिअर' सुरक्षारक्षक बनला! कचऱ्यात आलेला मोठा टेडी बिअर कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला ठेवला आणि वाहनचालकांचे लक्ष वेधून संभाव्य अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. कामगारांचा हा 'सेफ्टी जुगाड' लक्षवेधी असला, तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिकृत बॅरिकेड‌्सची व्यवस्था करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Teddy Bear Safety Jugaad
Pimpri Chinchwad Railway Quarters: चिंचवड रेल्वे क्वार्टर्सची दुरवस्था; झाडाझुडपांत सापांचा वावर, पावसाचे पाणी घरात

बॅरिकेड नाही…रिफ्लेक्टर नाही… मग 'टेडी'च!

कासारवाडी कचरा संकलन केंद्राबाहेर स्ट्रॉम वॉटर लाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था दिसून आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कचऱ्यात आलेला मोठा लाल टेडी बिअर रस्त्याच्या कडेला ठेवला. सुरक्षेसाठी केलेला हा जुगाड पाहून नागरिकही अवाक्!

Teddy Bear Safety Jugaad
PCMC X-Ray Machine Tender: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एक्स-रे मशिन खरेदीवर प्रश्नचिन्ह; १.४० कोटींचे मशिन २.७७ कोटींना?

कामगारांची काळजी; यंत्रणेचे काय?

कामगारांनी संभाव्य अपघात टाळण्यासाठी टेडी बिअर ठेवून वाहनचालकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हेतू नागरिकांची सुरक्षितता हा असला तरी कामाच्या ठिकाणी अधिकृत सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

'टेडी'चा लाल रंग दिसला; पण नियम कुठे दिसले?

लाल रंगाचा मोठा टेडी दुरून वाहनचालकांच्या नजरेस पडेल, या उद्देशाने तो ठेवण्यात आला. मात्र, महापालिकेच्या नागरी कामांमध्ये सुरक्षा उपाययोजनांसाठी निश्चित नियम असताना त्याऐवजी कचऱ्यातील खेळण्याचा वापर करण्याची वेळ का आली? याची चौकशी होणे गरजेचे आहे

Teddy Bear Safety Jugaad
Pimpri Chinchwad SIR Teachers: SIRच्या कामात शिक्षक अडकले; पिंपरी-चिंचवडमधील हजारो विद्यार्थ्यांचे अध्यापन ठप्प

कंत्राटदाराला सूचना दिल्या होत्या का?

काम सुरू करण्यापूर्वी सुरक्षा बॅरिकेड, रिफ्लेक्टर, रिबन आदी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला दिल्या होत्या का? सूचना दिल्या असतील तर त्यांची अंमलबजावणी का झाली नाही आणि दिल्या नसतील तर नागरिकांच्या सुरक्षेचे नियोजन कोण करणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

टेडी बिअरने दाखवला धोका; यंत्रणेने दाखवला का?

कामगारांनी स्वतःच्या पातळीवर टेडी बिअर ठेवून वाहनचालकांचे लक्ष वेधले. मात्र, नागरिकांच्या जीविताची सुरक्षा ही 'जुगाड'वर अवलंबून राहणार असेल, तर अधिकृत सुरक्षा व्यवस्थेची गरज काय? असा सवाल या घटनेने उपस्थित केला आहे.

Teddy Bear Safety Jugaad
Pimpri Chinchwad Water Supply: पवना धरण तुडुंब; तरीही पिंपरी-चिंचवडच्या ३४ सोसायट्यांना टँकरचा आधार!

काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे. टेडी बिअर हा कायमस्वरूपी सुरक्षा उपाय म्हणून ठेवलेला नाही. उपलब्ध परिस्थितीत वाहनचालकांचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तो तात्पुरता ठेवला होता. आवश्यक सुरक्षा साधने लावूनच समोर उभे राहून काम करून घेतले जाईल.

लक्ष्मण चौधरी, कंत्राटदार

रस्त्यावर काम सुरू असताना बॅरिकेड किंवा रिफ्लेक्टर दिसणे अपेक्षित आहे. रस्त्यावरील कामाच्या ठिकाणी खेळणे जुगाड ठेवण्यापेक्षा योग्य सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचे आहे. अशा ठिकाणी अचानक वाहन आल्यास धोका निर्माण होऊ शकतो.

विजय तातेड वाहन चालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news