Pimpri | फ्लेक्सबाजीवर पालिकेकडून कारवाईचा धडाका

पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना फ्लेक्स व किऑक्स लावण्यात येत आहेत.
Pimpri
Pimpri File Photo
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना फ्लेक्स व किऑक्स लावण्यात येत आहेत. त्या विनापरवाना फ्लेक्स तसेच किऑक्सवर महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने तसेच, क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकांकडून कारवाई केली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत ८४० फ्लेक्स आणि ९ हजार १०० किऑक्स जप्त करण्यात आले आहेत.

शहरात चौक, वर्दळीचे ठिकाण आणि विजेच्या खांबांवर, भिंतीवर विनापरवाना फ्लेक्स लावले जातात. तसेच, किऑक्स लावले जातात. त्यामुळे शहर परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. या विनापरवाना फ्लेक्समुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तुटलेल्या फ्लेक्समुळे अपघाचा धोका आहे. काही फ्लेक्समुळे वाहतुकीचे सिग्नल दिसत नाहीत.

अशा विनापरवाना फ्लेक्स व किऑक्सबाबत आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे दाखल तक्रारींची दखल घेऊन विभागाने तसेच, क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकांकडून कारवाई केली जात आहे. १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत एकूण ८४० फ्लेक्स काढून जप्त करण्यात आले आहेत. तर, ९ हजार १०० किऑक्स काढून जप्त केले आहेत. या प्रकरणी एकाही जाहिरातदारावर गुन्हा दाखल केला नसून, दंडही आकारण्यात आलेला नाही.

...तर फौजदारी कारवाई करणार

शहरात विनापरवाना फ्लेक्स व किऑक्स लावले जात आहेत. त्यामुळे शहर विद्रुप होत असून, अपघात होण्याचा धोका आहे. त्यासंदर्भात तक्रारींची संख्या वाढली आहे. अशा विनापरवाना फ्लेक्स व किऑक्सवर नियमितपणे कारवाई केली जात आहे.

वारंवार कारवाई करूनही सुधारणा न झाल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असे महापालिकेचे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

फुकट्या नेत्यांची वाढली संख्या

फुकटे नेते, राजकीय पदाधिकारी, माजी नगरसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी हे शुल्क न भरता वाढदिवस व शुभेच्छांच्या जाहिरात होर्डिंग लावतात. आकाशचिन्ह व परवाना विभागावर तसेच,

होर्डिंगमालकांवर दबाव टाकला जातो. कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च करणारे नेतेमंडळी फुकटच्या होर्डिंगसाठी महापालिका अधिकार्यांना त्रास देत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

इच्छुकांची मतदारसंघात चमकोगिरी

विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांकडून जाहिरातबाजी केली जात आहेत. होर्डिंगसह फ्लेक्स, किऑक्स व पोस्टर लावून मतदारसंघात चमकोगिरी केली जात आहे.

त्यामुळे शहर परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. मिळेल त्या ठिकाणी फ्लेक्स व पोस्टर लावले जात आहेत. अशा विनापरवाना फ्लेक्स व पोस्टरवरही महापालिकेच्या वतीने कारवाई केली जात आहे.

उद्योगधंदा परवाना नसणाऱ्यांना नोटिसा

शहरात व्यवसाय करणाऱ्या उद्योग, व्यवसाय व दुकानांना महापालिकेचा उद्योगधंदा परवाना घेणे आवश्यक आहे. मात्र, अनेक व्यावसायिक व विक्रेते उद्योगपरवाना घेत नसल्याचे चित्र आहे.

अशा व्यावसायिकांना महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून नोटीसा बजावण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण ४० जणांना नोटीसा दिल्या आहेत तर, १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Pimpri
महत्त्वाची बातमी ! जेईई मेन्स परीक्षा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ; तज्ज्ञांची माहिती
Pimpri
नाशिक : हृदयद्रावक! बेवारस अर्भकाची कुत्र्याने तोडली लचके

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news