Raw Mango Price: कैरी खातेय भाव! 60 ते 80 रुपये किलोने विक्री

कैरी 60 ते 80 रुपये किलोने उपलब्ध आहे. तसेच, ते फोडण्यासाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागत आहेत.
raw mango
raw mango Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी कैरी विक्रीसाठी आणल्याने सध्या बाजारात कैरीची आवक वाढली असली तरी कैरी मात्र, यंदा महागली आहे. कैरी 60 ते 80 रुपये किलोने उपलब्ध आहे. तसेच, ते फोडण्यासाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागत आहेत.

उडीद, पापड, कुरडया, शेवया, खारोड्या अशा वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू आहे. तसेच, आता जेवणाची चव वाढवणारा व ताटात हमखास दिसणारा एक पदार्थ म्हणजे कैरीचे लोणचे. मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाची शक्यता असते. त्यामुळे लोणचे करण्याची महिलांची लगबग दिसत आहे. या दिवसात लोणाच्याच्या कैऱ्यादेखील पूर्ण तयार झालेल्या असतात.

raw mango
Jijamata hospital Pimpri issues: जिजामाता रुग्णालयात वैद्यकीय सुविधांची कमतरता

मसाल्यांचे दर तेजीत

लोणचे जेवण रुचकर बनवते, परंतु आता लोणच्याच्या कैऱ्या भाव खाताना दिसताहेत. दरवर्षीप्रमाणे घरोघरी लोणचे बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. मागणीमुळे कैरीचे भावही वाढले आहेत. तसेच, मसाल्यांचे दर तेजीत आहेत. लोणच्यासाठी लागणारे शेंगदाणा तेल, गरम मसाले, मोहरी, हिंग, लवंग, हळद, बडीशेप, धणे, दालचिनी, वेलची, मोहरी डाळीचे भाव वधारले असले तरी घरगुती लोणचे तयार करताना महिला दिसत आहेत.

raw mango
One Nation Digital Track: मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी वन नेशन डिजिटल ट्रॅक

त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात लोणच्यासाठी लागणारा मसाला घेण्यासाठी बाजारात गर्दी होत आहे. तोंडाला चव नसेल तर लोणच्याचा आधार असतो. एक कैरीची फोड जेवणाची लज्जत वाढवित असते. लिंबापेक्षाही जास्त कैरीच्या लोणच्याला मागणी असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news