One Nation Digital Track: मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी वन नेशन डिजिटल ट्रॅक

आता अनोळखी मयतांची ओळख पटविण्यासाठी अधिक वैज्ञानिक, डिजिटल आणि सखोल कार्यपद्धती लागू करण्यात येत असून, त्यामुळे तपासाची गती आणि अचूकता वाढणार असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
One Nation Digital Track
One Nation Digital TrackPudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: अपघात, आत्महत्या, नैसर्गिक आपत्ती किंवा विविध गुन्ह्यांमध्ये सापडणाऱ्या अनोळखी मृतदेहांची ओळख पटविणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान ठरत आले आहे. अनेकदा मृतदेहाची अवस्था खराब झालेली असल्याने पोलिस तपासात अडथळे निर्माण होतात. मात्र, आता अनोळखी मयतांची ओळख पटविण्यासाठी अधिक वैज्ञानिक, डिजिटल आणि सखोल कार्यपद्धती लागू करण्यात येत असून, त्यामुळे तपासाची गती आणि अचूकता वाढणार असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

संबंधित कुटुंबांनाही मिळणार दिलासा

याशिवाय मयत व्यक्तीचे छायाचित्र, फिंगरप्रिंट, डीएनए नमुने आणि टिश्यू सॅम्पल जतन करून विविध डिजिटल प्रणालींमध्ये अपलोड करण्यात येणार आहेत. त्यामुळे देशभरातील हरविलेल्या व्यक्तींच्या डेटाशी तुलना करून संबंधित व्यक्तीची ओळख पटविणे अधिक सोपे होणार आहे.

One Nation Digital Track
Lawrence Bishnoi Gang: बिष्णोई गँगचे जेलमधून ‌‘एक्स्टॉर्शन नेटवर्क‌’; चंदिगढमध्ये ट्रेनिंग, परिसराची रेकी अन्‌‍ पुनावळेत फायरिंग

तपास प्रक्रियेदरम्यान सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप, रेल्वे स्थानके, बसस्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी माहिती प्रसारित केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार फेसियल रिकग्निशन तंत्रज्ञान तसेच सुपर इम्पोझिशन ऑफ स्कल या आधुनिक पद्धतींचाही वापर करण्यात येणार आहे. एखादी व्यक्ती परदेशी नागरिक असल्याचा संशय आल्यास इंटरपोलमार्फत ब्लॅक नोटीस जारी करण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे.

दरम्यान, ही कार्यपद्धती केवळ तांत्रिक स्वरूपाची नसून शास्त्रीय तपास, डिजिटल पडताळणी आणि माहितीची प्रभावी देवाणघेवाण यावर आधारित आहे. त्यामुळे अनोळखी मृतदेहांची ओळख पटविण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होणार असून संबंधित कुटुंबांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर

एनएटीजीआरआयडी, सीसीटीएनएस, सिटीझन पोर्टल, डिजिटल पोलिस पोर्टल, इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टिम, रेड्स ॲप, उमेद पोर्टल तसेच मतदार यादीच्या माध्यमातून मयत व्यक्तीची माहिती देशभरातील हरविलेल्या नागरिकांच्या नोंदींशी पडताळली जाणार आहे. साम्य असलेल्या व्यक्तींची माहिती त्वरित समोर येणार असल्याने नातेवाईकांपर्यंत माहिती पोहोचविणे अधिक वेगवान होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

One Nation Digital Track
Pimpri Chinchwad DP Plan: पिंपरी-चिंचवड सुधारित डीपी आराखड्याला विलंब; हरकतींमुळे प्रक्रिया रखडली

टेलर टॅगची वैज्ञानिक तपासणी केली जाणार

अनोळखी मुतदेहांची ओळख पटविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या कार्यपद्धतीनुसार मयत व्यक्तीच्या शरीरावरील अगदी सूक्ष्म बाबींचाही बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. शरीरावरील खुणा, जखमा, व्यंग, त्वचेचा रंग, उंची, दाढी-मिशा, केसांची ठेवण, टॅटू, दंतरोपण (डेंटल इम्प्लांट), अंगावरील कपडे, पादत्राणे तसेच, मृतदेहाजवळ आढळलेल्या वस्तूंची सविस्तर माहिती नोंदविण्यात येणार आहे. कपड्यांवरील लॉन्ड्री मार्क, ब्रँड आणि टेलर टॅगचीही वैज्ञानिक तपासणी केली जाणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  • शरीरावरील खुणा, व्यंग, दंतरोपणाची सविस्तर नोंद

  • डीएनए, फिंगरप्रिंट आणि टिश्यू नमुने जतन

  • एनएटीजीआरआयडी, सीसीटीएनएससह डिजिटल प्रणालींचा वापर

  • हरविलेल्या व्यक्तींच्या डेटाशी तुलना

  • फेसियल रिकग्निशन आणि सुपर इम्पोझिशन तंत्रज्ञानाचा वापर

  • सोशल मीडिया व सार्वजनिक ठिकाणी माहिती प्रसारित

  • परदेशी नागरिकांसाठी इंटरपोल ब्लॅक नोटीसची सुविधा

अनोळखी मयत व्यक्तींची ओळख पटविणे ही अत्यंत संवेदनशील प्रक्रिया आहे. नव्या कार्यपद्धतीमुळे तपास अधिक वेगवान, वैज्ञानिक आणि अचूक होईल. विविध डिजिटल प्रणालींच्या मदतीने हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे अधिक सोपे होणार असून, संबंधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल.

- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news