Hinjewadi kidnapping Case: हिंजवडी आयटी हबमध्ये दिवसाढवळ्या सिनेस्टाईल थरार; पत्नीनेच केले नवऱ्याच्या प्रेयसीचे अपहरण

नवऱ्याच्या प्रेमप्रकरणाला वैतागलेल्या पत्नीचे टोकाचे पाऊल : संतापलेल्या पत्नीने आई-भावासह प्रेयसीला गाडीत घालून चोपले
Kidnap
KidnapPudhari
Published on
Updated on

पिंपरी : हिंजवडी आयटी हबमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या एका महिलेच्या अपहरणाने शहरभर खळबळ उडाली आहे. स्वतःच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध थांबवण्यासाठी संतप्त पत्नीने आपल्या भावाला व आईला घेऊन थेट नवऱ्याच्या प्रेयसीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी (दि. २०) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ब्रम्हा क्रॉप फेज-२, विप्रो सर्कल येथे काम करणाऱ्या महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. “तुमचे पार्सल द्यायचे आहे” असे सांगत तिला ऑफिसबाहेर बोलावून घेतले. त्या ठिकाणी निळ्या रंगाच्या कारमधून आरोपी पत्नी, तिचा भाऊ आणि आई उतरले. त्यांनी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिला ताथवडे आणि वाकड परिसरात फिरवत बेदम मारहाण केली.

या प्रकरणात पत्नी, तिचा भाऊ व आईविरोधात अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवऱ्याच्या अनैतिक संबंधांना कंटाळून आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपी पत्नीने पोलिसांसमोर दिली.

Kidnap
ST Bus Service: हिंजवडी आयटी पार्क ते छत्रपती संभाजीनगर थेट एसटी सेवा सुरू; जाणून घ्या बसचे वेळापत्रक

“माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे”

कारमध्ये बसवून घेतल्यानंतर आरोपी पत्नीने संतापून नवऱ्याच्या प्रेयसीला दम दिला. “माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”. त्यानंतर तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. तब्बल दोन ते अडीच तास सुरू असलेल्या या थरारामुळे महिला भयभीत झाली होती.

सीसीटीव्हीत कैद घटना

पोलिस नियंत्रण कक्षाला अपहरणाची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये कोंबताना स्पष्ट दिसले. यावरून पोलिसांनी गाडीचा क्रमांक शोधून काढला आणि वाकड परिसरातून कार ताब्यात घेऊन प्रेयसी महिलेची सुटका केली.

Kidnap
हिंजवडी : आयटी पार्क अतिक्रमणाच्या विळख्यात

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पळापळ

घटनेच्या वेळी हद्दीत मुख्यमंत्री दौऱ्यावर असल्याने पोलिस प्रशासनात चांगलीच खळबळ माजली. दिवसाढवळ्या आयटी हब परिसरात अपहरणाची घटना घडल्याने पोलिस प्रशासनाची कसोटी पहावयास मिळाली. तब्बल दोन तास सुरू असलेल्या या नाट्यमय थरारानंतर अखेर पोलिसांनी पीडित महिलेला सुरक्षित ताब्यात घेत सुटकेचा निश्वास टाकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news