Fake Call Center: हिंजवडी आयटी पार्कमध्ये दोन बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; चार जण अटकेत

अमेरिकन नागरिकांची सायबर फसवणूक; 18 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल
Fake Call Center
Fake Call CenterPudhari
Published on
Updated on

पिंपरी: हिंजवडी आयटी पार्क परिसरातील दोन बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला. सायबर पोलिसांनी दोन कॉल सेंटरवर धाड टाकून मालक आणि मॅनेजर अशा चार जणांना अटक केली असून, 18 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक आरोपींना न्यायालयाने 18 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Fake Call Center
Divyang Job Fair: पिंपरीत दिव्यांग रोजगार मेळावा यशस्वी; 25 उमेदवारांना थेट नोकरी

स्काय हाय सोल्युशनचे मालक सागर कुमार यादव (32, रा. हिंजवडी), मॅनेजर आनंद पंकज सिन्हा (29, रा. वाघोली) यांच्यासह टेक लॉ सोल्युशनचे मालक धनंजय साहेबराव कासार (25, रा. माण, ता. मुळशी) आणि मॅनेजर हर्षद शंकर खामकर (28, रा. हिंजवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोन्ही कॉल सेंटरमधील एकूण 18 कर्मचाऱ्यांवरही फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Fake Call Center
Nagar Parishad Election: तळेगाव नगर परिषद निवडणूक : राष्ट्रवादी–भाजप महायुती जाहीर, 17/11 जागावाटप निश्चित

हिंजवडी परिसरात काही जणांकडून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करून फसवणूक सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांना मिळाली. त्यानुसार सायबर पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट दोनची दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे (सायबर पोलिस ठाणे) आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार (गुन्हे शाखा युनिट दोन) यांच्या पथकांनी हिंजवडी फेज दोन येथील अनधिकृत कॉल सेंटरवर छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी दोन्ही कॉल सेंटरमधून महत्त्वाचे साहित्य पोलिसांनी जप्त केले असून तपास सुरू आहे.

Fake Call Center
NCP Unity: भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?

या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन नागरिकांना खोट्या नावांनी कॉल करत, आम्ही अमेरिकेतील मेडिकल हेल्थ डिपार्टमेंटमधून बोलतो, असा खोटा परिचय देत होते. काही औषधांमुळे कॅन्सर होऊ शकतो, असे सांगून संबंधित व्यक्तींकडून वैयक्तिक माहिती काढली जात असे. त्यानंतर त्या व्यक्तींना संबंधित औषध कंपनीविरोधात कोर्टात जाण्यासाठी मदत मिळेल आणि भरघोस नुकसानभरपाई मिळेल, असे आमिष दाखवून त्यांची माहिती अमेरिकेतील लॉ फर्मला विकली जात होती.

Fake Call Center
Alandi News | अलंकापुरी दुमदुमली! इंद्रायणीकाठी वैष्णवांचा मेळा; संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

लॉ फर्मकडून मिळणाऱ्या कमिशनद्वारे या टोळीचा आर्थिक फायदा होत होता. स्काय हाय सोल्युशन कॉल सेंटरमधून अमेरिकेतील लोकांना फायनान्शियल कंपनीतून बोलत असल्याचे भासवून कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत होते. लिंकद्वारे पीडितांचा बँक तपशील मिळवून क्रेडिट स्कोर खराब असल्याचे सांगत, तो सुधारण्यासाठी गिफ्ट व्हाऊचर किंवा डॉलरच्या माध्यमातून रक्कम उकळली जात असल्याचे उघडकीस आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news