

पिंपरी: रावेत येथील इस्कॉन मंदिरतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन 15 व 16 ऑगस्टदरम्यान करण्यात आले आहे. जन्माष्टमीच्या दोन्ही तिथीला सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत भजन, कीर्तन असे सांस्कृतिक कार्यक्रम व महाअभिषेक आणि रात्री ठीक बारा वाजता भगवंतांची महाआरती करण्यात येणार आहे. (Latest Pimpri News)
दोन्ही दिवशी भगवंतांचे दर्शन सकाळी साडेसात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील. भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
शहरातील विविध भागांमधील मंदिरामध्ये श्रीकृष्णजन्माष्टमीची तयारी करण्यात आली आहे. मंदिरामध्ये फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. तसेच दुसर्या दिवशी दहीहंडी असल्याने शहर परिसरात दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. याबरोबरच शहरातील सोसायट्यांमध्येदेखील मध्यरात्री जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे.