Ganesh Visarjan Ghats: गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेची जय्यत तयारी; विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे

स्वच्छता, सुरक्षा व नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य; सीसीटीव्ही, जीवनरक्षक व आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना
Ganesh Visarjan Ghats
Ganesh Visarjan GhatsPudhari
Published on
Updated on

पिंपरी: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख विसर्जन घाटांवर करण्यात आलेल्या स्वच्छता, सुरक्षा व नागरिकांसाठीच्या सुविधांची महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाहणी केली. विसर्जनाच्या दिवशी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक सुविधा वेळेत पूर्ण करून मनुष्यबळ व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

Ganesh Visarjan Ghats
Military Dairy Farm Flyover: मिलिटरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे काम संथ; ठेकेदारावर कारवाई

महापौर लांडगे व आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी अधिकार्‍यांसमवेत पिंपरी कॅम्पातील सुभाष घाट, सांगवीतील अहिल्यादेवी होळकर घाट व वेताळ महाराज घाट, वाकड गावठाण घाट, चिंचवड येथील थेरगाव पूल घाट, रावेतमधील जाधववाडी घाट, इंद्रायणी नदी घाट तसेच, मोशी खाण या प्रमुख विसर्जनस्थळांची शुक्रवारी (दि.11) पाहणी केली. त्या दरम्यान, त्यांनी अधिकार्‍यांना आवश्यक सूचना केल्या. महापौर लांडगे म्हणाले की, गणेश विसर्जनासाठी येणार्‍या प्रत्येक भाविकाला सुरक्षित व सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. विसर्जन घाटांवरील स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, निर्माल्य संकलन, दिशादर्शक फलक, कृत्रिम विसर्जन हौद व सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करावी.

Ganesh Visarjan Ghats
Ganeshotsav Mahaprasad FDA Rules: गणेश मंडळांच्या महाप्रसादासाठी आता केटरर्सना एफडीएची प्रक्रिया बंधनकारक

विसर्जन घाटांवर भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग सुकर ठेवावेत. घाट परिसरात चिखल, घसरडेपणा किंवा पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. घाट परिसरातील स्वच्छता सातत्याने राखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या.

Ganesh Visarjan Ghats
PCMC Swagatam E Entry: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वागतम ई-प्रवेशाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निर्माल्य नदीपात्रात किंवा जलस्रोतांमध्ये जाणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देताना निर्माल्यकुंडांची योग्य ठिकाणी व्यवस्था करून त्याबाबत स्पष्ट दिशादर्शक फलक लावावेत. विसर्जनस्थळी निर्माण होणारा कचरा तातडीने संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. नागरिकांनीही निर्माल्य व इतर पूजासाहित्य जलस्रोतांमध्ये न टाकता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणार

विसर्जन घाटांवरील सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. जीवनरक्षकांची नियुक्ती करावी. अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवावीत. मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी सातत्यपूर्ण समन्वय राखावा. दिशादर्शक फलक ठळकपणे लावावेत, अशा सूचना महापौर लांडगे यांनी केल्या.

Ganesh Visarjan Ghats
Pimpri Municipal Engineer Suspension: महापालिका कार्यकारी अभियंता, उपअभियंत्याचे निलंबन

लहान मूतींचे विसर्जन कृत्रिम हौदात करावे

लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन हौदांमध्येच करावे. शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच स्वच्छ पाण्यात करावे. नदी, नाले आणि इतर जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. स्वच्छ, सुंदर पिंपरी चिंचवड घडविण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले.

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य

कृत्रिम विसर्जन हौदांची स्वच्छता, आवश्यक डागडुजी, प्रकाशयोजना व सुरक्षा व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावी. घाट परिसरातील विद्युत तारा, जोडण्या व विद्युत उपकरणांची सुरक्षितता तपासून कोणतीही धोकादायक स्थिती निर्माण होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. विसर्जनाच्या दिवशी वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रत्येक क्षेत्रीय अधिकार्‍याने आपल्या कार्यक्षेत्रातील विसर्जनस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध असल्याची खात्री करावी. घाट परिसर, विसर्जन मार्ग व परिसरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता सातत्याने राखावी. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विसर्जनाची संपूर्ण व्यवस्था सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावी, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news