Ganeshotsav Mahaprasad FDA Rules: गणेश मंडळांच्या महाप्रसादासाठी आता केटरर्सना एफडीएची प्रक्रिया बंधनकारक

महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या सात दिवस आधी पूर्वनियोजन नमुना सादर करणे आवश्यक; अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन बंधनकारक
Ganeshotsav Mahaprasad FDA Rules
Ganeshotsav Mahaprasad FDA RulesPudhari
Published on
Updated on

पिंपरी: गणेशोउत्सवाच्या काळात विविध गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद आणि सामूहिक अन्नवाटपाच्या कार्यक्रमांसाठी परवानाधारक केटरर्सना आता अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) आवश्यक प्रकिया पूर्ण करावी लागणार आहे. महाप्रसादाची ऑर्डर घेण्यापुर्वी संबंधित परवानाधारक केटरर्सनी एफडीएचा आधिकृत पूर्वनियोजन नमुना भरुन संबंधित झोनच्या अन्न सुरक्षा आधिकाऱ्यांकडे सादर करणे अपेक्षित आहे. त्यानंतरच परवानाधारक केटरर्सना मंडळाकडून महाप्रसाद तसेच अन्य सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमांची ऑर्डर घेता येणार आहे. हा नियम केवळ गणेशोत्सवासाठी मर्यादित नसून, आगामी सण- उत्सवांच्या काळात आयोजित होणाऱ्या महाप्रसाद व सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमांसाठीही लागू करण्यात आला आहे.

Ganeshotsav Mahaprasad FDA Rules
PCMC Swagatam E Entry: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वागतम ई-प्रवेशाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशोत्सवात मोठया प्रमाणावर भविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. या पार्श्वभूमीवर महाप्रसाद तयार करणाऱ्या केटरर्सकडून अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन होते आहे की नाही यांची माहिती प्रशासनाकडे पुर्वीच उपलब्ध व्हावी, यासाठी ही प्रकिया राबिण्यात येत आहे.या प्राकियेमुळे महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी केटरर्सची निवड करताना मंडळांनीही संबंधित केटरर्सकडे आवश्यक प्रकिया पुर्ण झालेली आहे की नाही, याची खात्री करणे महत्वाचे आहे.

Ganeshotsav Mahaprasad FDA Rules
Pimpri Municipal Engineer Suspension: महापालिका कार्यकारी अभियंता, उपअभियंत्याचे निलंबन

गणेशोत्सवाच्या कालावधीत मोठया प्रमाणावर अन्न तयार केले जाते आणि भविकांनमध्ये वाटप केले असल्याने अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता राखण्यासाठी एफडीए कडून ही प्रकिया राबविण्यात येत आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या केटरर्सविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे केटरर्सनी महाप्रसाद किंवा सामूहिक भोजनाची ऑर्डर स्वीकारण्यापुर्वी एफडीएची निर्धारित प्रकिया पुर्ण करुन अन्नसुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Ganeshotsav Mahaprasad FDA Rules
Supriya Sule: पिंपरी-चिंचवडमध्ये पक्ष संघटन मजबूत करा; सुप्रिया सुळे यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

केटरर्सवाल्यांनी सात दिवसापुर्वीनियोजन नमुना दयावा:

महाप्रसादाच्या कार्यक्रम आयोजित करण्याच्या किमान सात दिवसाआधी संबंधित केटरर्सनी एफडीएचा आधिकृत पूर्वनियोजन नमुना भरुन संबंधित झोनच्या एफडीए आधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे. ही प्रकिया मंडळानी नव्हे, तर महाप्रसादासाठी अन्न तयार करुन पुरवठा करणाऱ्या संबंधित पूर्ण करायचे आहे. एफडीएकडील आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच केटरर्सना संबंधित गणेश मंडळाकडून महाप्रसाद तसेच अन्य सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमाची ऑर्डर घेता येणार.

Ganeshotsav Mahaprasad FDA Rules
Pimpri Chinchwad Rooftop Hotel: पिंपरी-चिंचवडमध्ये रुफटॉप हॉटेलचे पुन्हा सर्वेक्षण; अनधिकृत हॉटेलवर होणार कारवाई

अन्न औषधप्रशासना कोणती माहिती द्यावी लागेल:

केटरर्सनी कार्यक्रमाचे ठिकाण, दिनांक, त्यासह अपेक्षित लाभार्थी संख्या , तयार करण्यात येणारे अन्न पदार्थ, आयोजकाची माहिती नमुन्यात नमूद करणे आवश्यक आहे. याशिवाय कॅटरर्सच्या एफएसएसआय परवाना क्रमांक व वैधता, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांची वैद्यकीय तपासणी, पाण्याचे स्त्रोत व पाणी तपासणी अहवाल, तसेच फॉसटैक प्रमाणित अन्नसुरक्षा पर्यवेक्षकाचे नाव , प्रमाणपत्र क्रमांक ही सर्व माहिती द्यावी लागणार आहे. तसेच तयार अन्नाचा नमुना ४८ तास जतन करण्याची व्यवस्था आणि कच्च्या मालाच्या पुरवठादाराची माहिती प्रशासनाला सादर करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news