Fugewadi Underpass Project Approval: फुगेवाडी भुयारी मार्गासह 4.42 कोटींच्या विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी

रेल्वेमार्गाखाली भुयारी मार्ग, ड्रेनेज सुधारणा, रुग्णालयातील आधुनिक यंत्रसामग्री आणि उद्यान विकासाला हिरवा कंदील
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: फुगेवाडी येथे हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम दफनभूमीकडे जाण्यासाठी रेल्वेमार्ग आणि 30 मीटर एचसीएमटीआर खाली भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 4 कोटी 42 लाख खर्चासह शहरात आवश्यक ठिकाणी व्हॉल्व बसविणे. नवीन जलवाहिनी तसेच, ड्रेनेजलाईन टाकणे, रुग्णालयात नवीन यंत्रसामुग्री घेणे अशा विविध कामांच्या खर्चाना स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Kalewadi Assault Case Dispute: काळेवाडी अत्याचार प्रकरणावरून महापालिकेत वाद; नगरसेवक-पोलिसांमध्ये आरोप-प्रत्यारोप

स्थायी समितीच्या बुधवारी (दि. 6) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते. या वेळी स्थायी समिती सदस्यांसह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगर सचिव मुकेश कोळप आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अपघातात अनेकांचा बळी

फुगेवाडी येथील हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम दफनभूमीकडे जाण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडावा लागतो. त्यात अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. हे टाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या खाली भुयारी मार्ग बांधण्यात येत आहे. त्या कामाचे आदेश चैतन्य कन्स्ट्रक्शनला 11 डिसेंबर 2025 ला देण्यात आले आहेत. रेल्वेच्या मालकीच्या जागेतील कामाच्या नकाशाला रेल्वे खात्याने 10 मार्च 2026 ला मान्यता दिली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Illegal Firearms Seizure: पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध शस्त्रसाठ्यावर मोठी कारवाई; चार आरोपी अटकेत

प्रस्तावित पुलाच्या कामाची पडताळणी रेल्वे विभागाकडून करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष काम करतेवेळी व्यवस्थापन व समन्वय ठेवला जाणार आहे. तसेच, दहा वर्षे भुयारी मार्गाची देखभाल व दुरूस्ती रेल्वे खाते करणार आहे. त्यासाठी 3 कोटी 42 लाख रुपयांची मागणी रेल्वेने केली आहे. त्या खर्चास समितीने मान्यता दिली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Construction Safety Issues: पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांचा वेग; मात्र सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष

सांगवी, पिंपळे निलख, पिंपळे गुरव परिसरातील ड्रेनेजलाईन टाकणे. अ, ब, क आणि फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ड्रेनेजलाईनची यांत्रिकी पद्धतीने दैनंदिन देखभाल व दुरुस्ती करणे, ग आणि ड क्षेत्रीय कार्यालयांतील आदर्शनगर, मिलिंदनगर, शास्त्रीनगर, सुभाषनगर, कैलासनगर, गांधीनगर, इंदिरानगर, बलदेवनगर, संजय गांधीनगर, तापकीरनगर, अण्णा भाऊ साठेनगर, काळाखडक, म्हातोबानगर आदी झोपडपट्टी भागांमध्ये ड्रेनेजलाईन व्यवस्था सुधारणे आदी कामांना मान्यता देण्यात आली.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
PCMC Nominated Corporators Issue: स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पुन्हा गोंधळ; विरोधकांचा सभागृहात राडा

उद्यानाचा विकास करण्यास मान्यता

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी अत्याधुनिक अल्ट्रा हाय डेफिनेशन कॅमेरा सिस्टम (ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपीसाठी) खरेदी करणे, आकुर्डी येथील नवीन रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रणेची वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे, नवीन तालेरा रुग्णालयातील दरवाजे व खिडक्यांसाठी पडदे बसविणे आणि लिफ्टची तीन वर्षांसाठी देखभाल करणे, शाहूनगर, संभाजीनगर, आकुर्डी, संत तुकारामनगर आणि केशवनगर-चिंचवड येथील मानधनावरील सार्वजनिक ग्रंथालयांना मुदतवाढ देणे, विविध प्रभागांतील उद्याने, शाळा, दुभाजक, आयलंड व मोकळ्या जागांमध्ये तैवान लॉन, ग्रीन लॉन, अमेरिका ब्लू लॉन, पास्को लॉन यांचा पुरवठा व विकास करण्यास आदी कामांना समितीने मान्यता दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news