Pimpri Chinchwad Illegal Firearms Seizure: पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध शस्त्रसाठ्यावर मोठी कारवाई; चार आरोपी अटकेत

9 देशी कट्टे, 46 जिवंत काडतुसे आणि दोन वाहने जप्त; देहूरोड गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांची मोहीम तीव्र
Pistol Arrest
Pistol Arrest Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत अवैध शस्त्रसाठ्यावर सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट एकने मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे.

Pistol Arrest
Pimpri Chinchwad Construction Safety Issues: पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांचा वेग; मात्र सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष

या कारवाईत 9 देशी कट्टे, 5 मॅगझिन, 46 जिवंत काडतुसे व दोन वाहने असा सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. देहूरोड परिसरात व्यापाऱ्यावर गोळीबार करुन हत्या झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अधिक तीव करण्यात आली होती.

Pistol Arrest
PCMC Nominated Corporators Issue: स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पुन्हा गोंधळ; विरोधकांचा सभागृहात राडा

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अझरुद्दीन रफिक सुतार (30, रा. महाराष्ट्र कॉलनी, थेरगाव, पुणे), वैभव अशोक शेठे (31, रा. महाराष्ट्र कॉलनी, थेरगाव, पुणे), सौरभ धनंजय जाधव (27, रा. पाषाण, पुणे) आणि अक्षय अशोक कांबळे (31, रा. पाषाण, पुणे) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी वेगवेगळ्या व्यवसायात कार्यरत असून त्यांच्याकडून अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

Pistol Arrest
Talegaon AI Lab School: तळेगावातील शाळेत एआय लॅब सज्ज; विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण

पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. देहूरोड येथे रमेश रेड्डी हत्येच्या घटनेनंतर या मोहिमेला अधिक गती देण्यात आली.

Pistol Arrest
Maval APMC Stay Order: मावळ बाजार समितीला दिलासा; बरखास्तीच्या आदेशाला स्थगिती

गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुळीग आणि उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना अटक केली. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news