Fugewadi Toxic Liquor Case: फुगेवाडीत विषारी दारू प्रकरण; वायसीएम रुग्णालयातील तिन्ही रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मोफत उपचार; तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे प्रकृतीत लक्षणीय सुधारणा
YCM Hospital
YCM HospitalPudhari
Published on
Updated on

पिंपरी: फुगेवाडी येथील विषारी दारू प्रकरणात बाधित तीनही रुग्णांची प्रकृती आता पूर्णपणे सुधारली आहे. त्यांना महापालिकेच्या शवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार या सर्व रुग्णांवर संपूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले.

YCM Hospital
Pimpri Chinchwad Encroachment Drive: पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी कारवाई; कुदळवाडीत 10 अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडली

विषारी दारू सेवनामुळे गंभीर स्थितीत रुग्णांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल होताच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करण्यात आले. आवश्यक वैद्यकीय चाचण्या, औषधोपचार व विशेष व्यवस्था पुरविण्यात आली. रुग्णांच्या नातेवाईकांनाही वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी व आवश्यक औषधोपचार यांच्या मदतीने रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली.

YCM Hospital
Lonavala Cleanliness Drive Waste Issue: लोणावळ्यात स्वच्छता मोहिमेनंतरही कचऱ्याचे ढीग; नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

त्या रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत वायसीएम रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर झाली असून ते पूर्णपणे बरे होऊन निरोगी अवस्थेत घरी परतत आहेत. रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा आणण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वला अंदूरकर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण सोनी तसेच, डॉ. राहुल गायकवाड, डॉ. राम मुंढे, डॉ. नम्रता करकनाळे यांनी विशेष परिश्रम घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

YCM Hospital
Pimpri Chinchwad Sewage Problem: पिंपरी-चिंचवडमध्ये 600 एमएलडी सांडपाणी थेट नद्यांत; प्रदूषणात महापालिकेचाही सहभाग उघड

डॉक्टरांकडून वेळेत उपचार

विषारी दारू प्रकरणातील रुग्णांची स्थिती लक्षात घेऊन त्यांच्यावर तातडीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने उपचार करण्यात आले. विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी समन्वयाने काम करत रुग्णांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले. वैद्यकीय विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर केलेल्या उपचारांमुळे सर्व रुग्णांची प्रकृती पूर्णपणे सुधारली, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

YCM Hospital
Fertilizer App System Problem: उर्से मावळात खत खरेदीसाठी नवीन ॲप प्रणालीमुळे शेतकरी त्रस्त; तांत्रिक अडचणींचा डोंगर

सर्व वैद्यकीय उपचार मोफत

आपत्कालीन परिस्थिती तज्ज्ञ डॉक्टरांनी व वैद्यकीय कर्मचार्‍यांनी रुग्णांवर अत्यंत दक्षतेने उपचार केले. रुग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या, औषधोपचार आणि सुविधा वायसीएम रुग्णालयामार्फत वेळेत व मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या, असे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news