Fire brigade obstacles: वाढत्या अतिक्रमणांमुळे घटनास्थळी पोहोचण्यास अग्नीशामक दलास येताहेत अडथळे

जगात भारी, पण वेळेला अपुरी!
Fire brigade obstacles
वाढत्या अतिक्रमणांमुळे घटनास्थळी पोहोचण्यास अग्नीशामक दलास येताहेत अडथळे File Photo
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: शहरातील लोकवस्ती वाढीचा वेग मोठा आहे. तसेच, भंगार दुकाने व गोदामे तसेच, इतर धोकादायक व्यवसायाची संख्या वाढतच आहे. त्यामुळे शहरात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. महापालिकेडून अग्निशमन यंत्रणा वाढीवर भर देण्यात आला आहे; मात्र वाढत्या अतिक्रमणांमुळे अग्नीशमन यंत्रणा घटनास्थळी पोचण्यास विलंब होत असल्याने जीवित व वित्तहानी काही थांबत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंत्रणा अद्ययावत असूनही ती अपुरी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरात सर्वत्र टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. असंख्य हाऊसिंग सोसायट्या निर्माण होत आहेत. परिणामी, दाट लोकवस्ती निर्माण झाली आहे; तसेच वाहनांची संख्याही वाढत आहे.  (Latest Pimpri News)

Fire brigade obstacles
PM Awas Yojana: डुडुळगाव पंतप्रधान आवास योजनेच्या बांधकाम खर्चात वाढ

अनधिकृत बांधकामे, पत्राशेडची बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे अनियोजनबद्ध विकास होत आहे. साईट व फ्रंटमार्जिन न सोडल्याने रस्ते अरुंद होत आहेत. नागरिकांच्या गरजा भागविण्यासाठी हॉटेल्स, खाऊ गल्ल्या, बेकरी, गॅरेज, तसेच, टपर्‍या, भंगार गोदामे, तसेच, औद्योगिक उद्योग व वर्कशॉप आदींची संख्या वाढतच आहे. खुलेआमपणे रस्त्याच्याकडेला खाद्यपदार्थ बनवून विकले जातात. यामुळे आगीच्या घटना वारंवार होत आहेत.

धोकादायक व्यवसाय, दुकाने, गाळे व आस्थापना शोधून काढण्यासाठी महापालिकेने शहरभरात सर्वेक्षणही केले. व्यावसायिक, उद्योग, वर्कशॉप यांना फायर सर्टिफिकेट घेण्याची सक्ती केली. त्यानंतर कुदळवाडी भागात महापालिकेच्या धडक कारवाईत तब्बल 4 हजार 111 भंगार गोदामे, लघुउद्योग व इतर आस्थापनांवर बुलडोझर चालवत एकूण 825 एकर जागा रिकामी करण्यात आली. त्यानंतर शहरातील इतर ठिकाणची कारवाई गुंडाळण्यात आल्याचे चित्र आहे.

शहरात मोशी, पिंपरी, दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी, भोसरी, आकुर्डी, चिंचवड, चिंचवड स्टेशन, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, रावेत, पुनावळे, एमआयडीसी आदी भागांत भंगार दुकाने व गोदामांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेषत: पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीकाठी तसेच, नाल्याच्या बाजूने भंगार दुकाने थाटली जात आहेत. मोठे मोठे पत्राशेड टाकून व्यवसाय केला जात आहे. अनेक गोदामे तर, भर लोकवस्तीमध्ये आहेत. त्यामुळे अस्वच्छता वाढत आहे. कचरा जाळण्याचे प्रकारामुळे प्रदूषणात भर पडते.

कोणताही व्यवसाय व उद्योग परवाना न घेता, भंगार गोदामे आणि इतर धोकादायक व्यवसाय केले जात आहेत. तसेच, दाटलोकवस्तीमुळे आगीच्या घटना सातत्याने घडत आहे. विशेषत: उन्हाळ्यात आगीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहे.

Fire brigade obstacles
Pollution Free Ganeshotsav: प्रदूषणमुक्त गणेशोत्सवासाठी जनजागृती मोहीम

महापालिकेची अग्निशमन यंत्रणा सक्षम असल्याचा दावा केला जातो. मात्र, घटनास्थळी पोहचेपर्यंत आगीमुळे मोठे नुकसान झालेले असते. अरुंद रस्ते, वाढते अतिक्रमण, अशास्त्रीय गतिरोधक, वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे आगीचे बंब घटनास्थळी पोहण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण वाढत आहे.

कामगार, मजुरांचा आगीत मृत्यू

दाट लोकवस्तीतील तळवडे येथील स्पार्कल फायर कॅण्डल बनविणार्‍या कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीत 14 महिला कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना 8 डिसेंबर 2023 ला घडली. त्यापूर्वी 30 ऑगस्ट 2023 ला पूर्णानगर येथील हार्डवेअरच्या दुकानास आग लागून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी झालेल्या आगीच्या घटनात आकुर्डीत एका वर्कशॉपमध्ये कामगाराचा मृत्यू झाला. दर महिन्यास सरासरी 80 ते 100 घटना

पिंपरी-चिंचवड शहरात आग तसेच, इतर दुर्घटना सातत्याने घडत आहेत. दर महिन्यास सरासरी 80 ते 100 घटना घडण्याचे प्रमाण आहे. आग, शार्टसर्किट, प्राणी व पक्ष्यांच्या बचाव असे प्रकार महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे नोंदविले जातात. त्यात आगीच्या घटना सर्वांधिक आहेत. त्यानंतर शार्टसर्किटमुळे आगी लागण्याचे प्रकार घडतात.

फायर सर्टिफिकेटसाठी सर्वेक्षण

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उद्योग, व्यवसाय, दुकाने व आस्थापनांचे महापालिकेने सर्वेक्षण केले आहे. सर्व आस्थापनांनी अग्निसुरक्षा यंत्रणा उभारून फायर सर्टिफिकेट घेणे बंधनकारक केले आहे. त्याबाबत नोटिसा बजावल्या जात आहेत. सर्व यंत्रणा पूर्ण करून त्यांना एनओसी घेणे सक्तीचे आहे. अग्निसुरक्षा यंत्रणाची पूर्तता न केल्यास त्या आस्थापना सील केल्या जातात, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news