Duplicate Voter list Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड मतदार यादीत हजारो दुबार नावे; राष्ट्रवादीकडून निवडणूक विभागाकडे तक्रार

अजित गव्हाणे यांची कारवाईची मागणी; पारदर्शक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन सतर्क
पिंपरी-चिंचवड मतदार यादीत हजारो दुबार नावे
पिंपरी-चिंचवड मतदार यादीत हजारो दुबार नावेआरक्षणाची सोडतPudhari
Published on
Updated on

पिंपरी : राज्यात मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदारांच्या नावांवरून राजकारण तापले आहे. त्यात पिंपरी-चिंचवड शहरातही दुबार मतदारांचा मुद्दा पुढे आला आहे. पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघात हजारो दुबार नावे आहेत. ती नावे रद्द करावीत, अशी तक्रार महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे केली आहे.(Latest Pimpri chinchwad News)

पिंपरी-चिंचवड मतदार यादीत हजारो दुबार नावे
Bangladeshi Woman Arrest Pimpri-Chinchwad: दोन नावांनी वास्तव्यास असलेली बांगलादेशी महिला भोसरीत अटक

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जानेवारी 2026 ला होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येत असून, इच्छुक माजी नगरसेवक प्रभागात कामाला लागले आहेत. त्यात दुबार मतदारांचा पुढे आल्याने शहरातील वातावरण तापत आहे.

माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दुबार मतदारांची यादी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे सादर केली आहे. आगामी निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार यादीतील त्रृटी दूर करणे आवश्यक आहे. त्रृटी दूर न झाल्यास एकाच प्रभागात वेगवेगळ्या मतदार केंद्रावर दुबार व तिबार मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुबार मतदारांबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी. जेणे करून दुबार मतदारांबाबत योग्य कार्यवाही व मतदार यादीतील दोष टाळण्यास मदत होईल, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड मतदार यादीत हजारो दुबार नावे
Marathi Theatre Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये मराठी नाट्य चळवळीचा वाढता झंकार

आम्ही लक्षात आणून दिलेली ही केवळ प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्ष छाननीनंतर फक्त भोसरी मतदारसंघाचा हा आकडा लाखभरांपर्यंत जाऊ शकतो. शहरात नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतरित झालेले नागरिक इतर जिल्ह्यांत वास्तव्यास असूनही त्यांची नावे शहराच्या मतदार यादीत कायम आहेत. तसेच, काही नावे मुद्दामहून पुन्हा-पुन्हा टाकल्याचे दिसते. ज्यामुळे निवडणुकीदरम्यान मतदारसंख्येत कृत्रिम वाढ झाली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. विशेष पथक स्थापन करून छाननीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार मतदार यादी शुद्धीकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news