Pimpri Hospital Crime: उपचारादरम्यान महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; डॉक्टर अटकेत

स्टॉकिंग नीट करण्याच्या बहाण्याने चुकीचा स्पर्श केल्याची तक्रार; निगडी पोलिसांकडून तपास सुरू
Doctor Arrested
Doctor ArrestedPudhari
Published on
Updated on

पिंपरी: उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चिंचवडमधील एका डॉक्टरला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. उपचार सुरू असताना स्टॉकिंग नीट करण्याच्या बहाण्याने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप डॉक्टरवर करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. १४) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथील चेतना हॉस्पिटलमध्ये घडली.

Doctor Arrested
Pimpri Chinchwad Nominated Corporators: स्वीकृत नगरसेवक निवड पुन्हा लांबणीवर; भाजपने विषय दप्तरी दाखल केला

याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डॉ. धैर्यशील शेटक (२७, रा. संभाजीनगर, चिंचवड, मूळ रा. कोल्हापूर) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करीत त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला काही दिवसांपासून उपचारासाठी संभाजीनगर येथील चेतना हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या.

Doctor Arrested
School Supplies Price Hike: शालेय साहित्य दरात ३०–४०% वाढ; पालकांचे बजेट कोलमडले

त्यांच्यावर महिला वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी डॉक्टर वॉर्डमध्ये आला. उपचाराचा भाग असल्याचे भासवत त्याने महिलेच्या पायाला लावलेले स्टॉकिंग नीट करण्याचे कारण सांगितले. त्यानंतर त्याने महिलेच्या मांडीला तसेच खासगी भागाला स्पर्श केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Doctor Arrested
Talwade Welcome Arch: तळवडे स्वागत कमानीचे काम चार वर्षांपासून रखडले; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

या प्रकारामुळे महिला घाबरल्या आणि त्यांनी तत्काळ याबाबत आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांच्या निदर्शनास आणून दिला. नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर महिलेने निगडी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.

Doctor Arrested
Maval Gram Panchayat Elections: मावळमध्ये ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगीनघाई; आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण

परिसरात खळबळ

तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. प्राथमिक चौकशीनंतर आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी रुग्णालयातील परिस्थिती, उपस्थित कर्मचारी, तसेच रुग्णालयातील नोंदी याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. दरम्यान, रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरकडूनच अशा प्रकारचा आरोप झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विश्वासाच्या नात्याला धक्का देणारी ही घटना मानली जात आहे. तपास निगडी पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news