Dehuroad Firing Murder Case: देहूरोडमध्ये गोळीबार करून खून; रमेश रेड्डी प्रकरणात धक्कादायक उघड

देहूरोड येथे रमेश रेड्डी यांचा 21 गोळ्या झाडून खून; जुन्या वैमनस्यातून हल्ला, 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू
Dehuroad Firing Murder Case
Dehuroad Firing Murder CasePudhari
Published on
Updated on

पिंपरी: तुरुंगात असलेल्या आईच्या जामिनाला विरोध करत असल्याने रमेश गुरूस्वामी रेड्डी यांचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. तीन महिन्यांपूर्वीच आरोपींनी रमेश रेड्डी यांच्या घरासमोर उभे राहून, आईला जामीन झाला नाही तर सर्वांना जीवे मारू, अशी धमकी दिली होती. रमेश रेड्डी यांच्यावर आरोपींनी तब्बल 21 गोळ्या झाडल्या असून त्यातील नऊ गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या आहेत. दरम्यान, आरोपींच्या मागावर पोलिसांची तपास पथके तैनात करण्यात आली आहेत. देहूरोड येथे मंगळवारी (दि. 28) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

Dehuroad Firing Murder Case
Pimpri Flyover Railway Block Delay: पिंपरी मिलिटरी डेअरी उड्डाणपूल रखडला; रेल्वे ब्लॉकमुळे कामात विलंब

मयत रमेश रेड्डी यांची बहीण शारदा रेड्डी (39) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लखन आगळे, आफताब समीर शेख, अरमान शेख आणि इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षांपूर्वी रमेश रेड्डी यांचा भाऊ विक्रम गुरूस्वामी रेड्डी याच्यावर गोळीबार करून खून करण्यात आला होता. त्या गुन्ह्यामध्ये साबीर समीर शेख, त्याची आई रजिया समीर शेख व त्यांचे साथीदार हे आरोपी असून ते सध्या जेलमध्ये आहेत.

Dehuroad Firing Murder Case
Pimpri Chinchwad Police Investigation Unit: पिंपरी-चिंचवड पोलिसांचा निर्णय; प्रत्येक ठाण्यात ‘इन्व्हेस्टिगेशन युनिट’

तीन महिन्यांपूर्वी साबीर शेख यांचा भाऊ आरोपी आफताब समीर शेख याने रमेश रेड्डी यांच्या घरासमोर उभे राहून, रजिया शेखला जामीन झाला नाही, तर मी रमेश रेड्डी आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. या वादातूनच रमेश रेड्डी यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाठीमागून झाडल्या गोळ्या

रमेश रेड्डी आणि त्यांचा मित्र संतोष स्वीट मार्टच्या मागील कपड्यांच्या दुकानांमध्ये कपडे घेण्यासाठी दुचाकीवर गेले होते. कपडे घेऊन दुचाकी सुरू करत असतानाच एक कार आणि दुचाकीवरून आरोपी तेथे आले. त्यांच्या हातात पिस्तूल आणि कोयते होते. सर्व आरोपी रमेश रेड्डी यांना शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने धावले. त्या वेळी रमेश रेड्डी आणि त्यांच्या मित्रांनी लोकांकडे मदत मागितली; मात्र बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक भीतीने सैरावैरा पळू लागले. रमेश रेड्डी पळून जात असताना आरोपींनी मागून गोळीबार केला. तसेच त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या रमेश रेड्डी यांना तातडीने देहूरोड येथील आधार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Dehuroad Firing Murder Case
Pimpri Budget Scam 60 Crore: पिंपरीत 60 कोटींचा अर्थसंकल्प घोटाळा; नगरसेवकांवर कारवाईची मागणी

वायसीएम रुग्णालयात तब्बल तीन तास तणाव

देहूरोड येथील आधार रुग्णालयातून रमेश रेड्डी यांना रात्री साडेनऊच्या सुमारास ॲम्बुलन्समधून वायसीएम रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रुग्णालय परिसरात प्रचंड आरडाओरडा आणि गोंधळ झाला होता. डॉक्टरांनी सर्व तपासणी करून नातेवाईक आणि जमलेल्या गर्दीसमोर रमेश रेड्डी यांना मृत घोषित केले. मृतदेहात तब्बल नऊ गोळ्या लागल्याचे तसेच डोक्यावर कोयत्याचे वार झाल्याचे दिसून आले. नातेवाईक आणि नागरिकांच्या गर्दीमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी गर्दी पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

‌‘त्याच ठिकाणी‌’ पुन्हा गोळीबार

देहूरोड परिसरातील याच ठिकाणी पूर्वीही गोळीबाराची घटना घडली होती. 13 जून 2019 रोजी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक विकास खंडेलवाल यांच्यावर याच टोळीतील आरोपींनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात खंडेलवाल थोडक्यात बचावले होते. परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याचा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात तत्कालीन अपर आयुक्त रामानंद पोकळे यांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई केली होती. मात्र, पुढे आरोपींनी कायदेशीर पळवाटा शोधत जामीन मिळवला होता.

Dehuroad Firing Murder Case
Vallabhnagar Depot Reservation Rush: वल्लभनगर आगारात आरक्षणासाठी गर्दी; सोयीअभावी प्रवासी त्रस्त

पूर्ववैमनस्यातून रमेश रेड्डी यांचा गोळीबार करून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून संशयित आरोपींकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.

डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news