Dehuroad Kidnapping Attempt: देहूरोडमध्ये चिमुकल्याचे अपहरण फसले; नागरिकांची तत्परता

आईच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले
Kidnapping
KidnappingPudhari
Published on
Updated on

देहूरोड: परिसरातील 22 महिन्यांच्या चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. सुदैवाने, चिमुकल्याच्या आईची सतर्कता आणि स्थानिक नागरिकांच्या धाडसामुळे आरोपीला पकडण्यात यश आले.

Kidnapping
Maval Road Problem: जांबवडे–एमआयडीसी रस्ता खड्ड्यांत; नागरिक हैराण

या प्रकरणी शीलत अक्षय डिलोड (प्रगती कॉलनी, विकासनगर, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. अमीर मेहबूब शेख (वय 20, रा. गांधीनगर झोपडपट्टी, देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासनगर येथील त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये राहणारी एक महिला 28 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या लहान मुलासोबत घराबाहेर गेली होती. काही वेळानंतर त्या परत सोसायटीमध्ये आल्या आणि त्यांचा 22 महिन्यांचा मुलगा सोसायटीच्या पार्किंग परिसरात खेळत होता.

Kidnapping
Pimpri Vegetable Prices: पिंपरीत शेवग्याचे दर घसरले; बिन्स-मटार महाग

याचवेळी आरोपी तेथे आला. त्याने आजूबाजूला पाहणी करत अचानक त्या चिमुकल्याला उचलून नेले. हा प्रकार लक्षात येताच चिमुकल्याच्या आईने मोठ्याने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी आणि रस्त्यावरून जाणारे नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. नागरिकांनी तत्परतेने पाठलाग करून त्या युवकाला पकडले. नागरिकांनी त्याला पकडून ठेवले आणि त्वरित पोलिसांना घटनेची माहिती दिली.

Kidnapping
Palm Sunday Celebration: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘होसान्ना’चा जयघोष; पाम संडे उत्साहात साजरा

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू केली असून, त्यामागे आणखी कोणाचा हात आहे का? याचाही तपास केला जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिता धुनावकर करत आहेत.

Kidnapping
Pune Tourism Development: मावळ-मुळशी-हवेली पर्यटनाला बूस्ट; पीएमआरडीएचा 67 कोटींचा विकास आराखडा

परिसरात भीतीचे वातावरण

या घटनेनंतर प्रगती कॉलनी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, सोसायटीमध्ये सुरक्षा वाढवण्याची मागणी होत आहे.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

या घटनेत सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे स्थानिक नागरिकांनी दाखवलेली जागरूकता आणि धाडस यामुळे बालकाचे अपहरण टळले. आपल्या परिसरात संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे आणि लहान मुलांवर नेहमी लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news