Pimpri Dengue Cases: शहरात डेंग्यूचा फैलाव; पाच दिवसांत ६ रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह

विविध भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून धूर आणि औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.
Dengue
DenguePudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले असून, गेल्या पाच दिवसांत डेंग्यूचे ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर २८४ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

शहरातील विविध भागांत हे रुग्ण आढळले असून, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.

Dengue
Diwali Ready Made Faral: दिवाळीत रेडिमेड फराळाला वाढती पसंती; वेळेअभावी तयार पदार्थांच्या खरेदीकडे कल

पावसाळ्यानंतर साचलेले पाणी, घरातील कुंड्या, कुलर, टाक्यांमध्ये साचलेले स्वच्छ पाणी यात डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ज्या भागात रुग्ण आढळले, त्या ठिकाणी धूर आणि औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.

Dengue
Mumbai ED Action : छोटा शकीलच्या मेहुण्याची डोंगरीतील इमारत ईडीकडून जप्त

नागरिकांनी घरात व परिसरात पाणी साचू देऊ नये, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, अंग झाकणारे कपडे घालावेत, ताप आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.